३.३१ लाख रुपयांचा दारूसाठा जप्त

By Admin | Updated: July 21, 2015 00:36 IST2015-07-21T00:36:31+5:302015-07-21T00:36:31+5:30

राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे अवैध हातभट्टी मोहाफुलाची दारु गाळणाऱ्या व विक्री करणाऱ्याविरुध्द १४ व १५ जुलै या कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात आली

3.31 lakh worth of liquor seized | ३.३१ लाख रुपयांचा दारूसाठा जप्त

३.३१ लाख रुपयांचा दारूसाठा जप्त

८४ जणांविरूद्ध गुन्हे दाखल : उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
भंडारा : राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे अवैध हातभट्टी मोहाफुलाची दारु गाळणाऱ्या व विक्री करणाऱ्याविरुध्द १४ व १५ जुलै या कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात आली. यात २१ गुन्हे नोंदविण्यात आले आहे. यामध्ये २०० लिटर हातभट्टीची गावठी दारु, मोहफुल रसायन, मोहफुलाचा सडवा, मोहफुले असे एकूण ३.३१ लाख ६५० रुपयांचा मुद्देमाल व दारू गाळण्याचे साहित्य जप्त करण्यात आले.
जिल्ह्यातील देशी, विदेशी दारु दुकानांची विक्री गैरव्यवहारामुळे कमी दाखविण्यात येत आहे. अशा अनुज्ञप्तींची सखोल तपासणी करण्यात येऊन विभागीय नियमभंग प्रकरणे नोंदविण्यात आली आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकूण ८४ गुन्हे नोंदवून ४८ आरोपींना अटक केली. या कारवाईत १ हजार १४१ लिटर गावठी हातभट्टीची दारु, १७ लिटर देशी दारु तसेच २० हजार ५६५ लिटर मोहफुल रसायन (सडवा) जप्त केला असून त्याची एकूण किंमत ५ लाख १२ हजार ४९५ रुपये इतकी आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने शासनाच्या महसुलाचे नुकसान करणाऱ्यांविरुध्द कडक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले असून यापुढेही अशी विशेष मोहीम सुरु ठेवण्यात येणार आहे. ही मोहीम उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपआयुक्त पी.एच. पवार यांच्या मार्गदर्शनात अधीक्षक एन.के. धार्मिक या नेतृत्वात करण्यात आली. या मोहीमेत निरिक्षक बी.डी. पटले, आर.व्ही. अंभोरे, आर.जी वानखेडे, दुय्यम निरीक्षक ए.आर. कैकाडे, एन.एस. धुरड, आर.आर. उरकुडे, एम.पी. चिटमलवार, आर.डी. बोलधने यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)

Web Title: 3.31 lakh worth of liquor seized