रेती वाहतुकीचे ३३ ट्रक पकडले
By Admin | Updated: July 15, 2015 00:37 IST2015-07-15T00:37:43+5:302015-07-15T00:37:43+5:30
वैनगंगा नदीघाटावरुन चोरीची रेती मोठ्या प्रमाणात उपसा करुन बाहेर घेवून जात असतांना ...

रेती वाहतुकीचे ३३ ट्रक पकडले
नीलज येथील घटना : रॉयल्टी असल्याने एकाला सोडले
पवनी : वैनगंगा नदीघाटावरुन चोरीची रेती मोठ्या प्रमाणात उपसा करुन बाहेर घेवून जात असतांना निलज फाट्यावर महसूल विभागाचे कर्मचाऱ्यांनी अडविली चौकशी करुन रॉयल्टी असलेल्या एक ट्रकला सोडून ३२ ट्रक कार्यवाहीसाठी पोलीस व महसूल कर्मचाऱ्यांचे निगराणीत ठेवण्यात आले आहेत.
तहसिलदार नरेंद्र राचेलवार यांचे पथकाने कार्यवाही सुरु केली असता ट्रक डायव्हर कागदपत्रांची पुर्तता न करता पळून गेल्याचे समजते. घटनास्थळी पंचनामा करुन दंड वसूल कराचा अशा प्रकारचा दबाव रेती माफीयांकडून येत असला तरी चालनद्वारे बँकेत रक्कम जमा केल्यानंतर ट्रक सोडण्यात येतील असे तहसिलदाराने आमच्या प्रतिनिधीस सांगितले.
ट्रक अडविल्यानंतर महसूल कर्मचारी, तलाठी व बंदोबस्तासाठी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. (तालुका प्रतिनिधी)