३३ दरवाजे अर्धा मीटरने उघडले
By Admin | Updated: September 9, 2014 00:09 IST2014-09-09T00:09:57+5:302014-09-09T00:09:57+5:30
गोसीखुर्द धरणाच्या जलग्रहन क्षेत्रात मागील ४८ तासापासून सतत पडत असलेल्या पावसामुळे धरणात येणाऱ्या प्रवाहात वाढ होवून जलस्तर वाढत असल्यामुळे काल रात्री १० वाजेपासून सोमवारी

३३ दरवाजे अर्धा मीटरने उघडले
गोसे (बुज.) : गोसीखुर्द धरणाच्या जलग्रहन क्षेत्रात मागील ४८ तासापासून सतत पडत असलेल्या पावसामुळे धरणात येणाऱ्या प्रवाहात वाढ होवून जलस्तर वाढत असल्यामुळे काल रात्री १० वाजेपासून सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत धरणाची सर्व ३३ वक्रद्वारे अर्ध्या मीटरने उघडली होती. आज सकाळी पाऊस कमी झाल्यामुळे दारे कमी करून १५ दारे उघडण्यात आली आहेत.
मागील ४८ तासापासून गोसीखुर्द धरणाच्या जलग्रहन क्षेत्रात व भंडारा, गोंदिया, नागपूर जिल्ह्यात सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे भंडाराकडून वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या प्रवाहात वाढ होवून धरणाचा जलस्तर वाढणे सुरू झाले होते. त्यामुळे बुडीत क्षेत्रातील कोणत्याही गावाला धोका होवू नये याकरीता धरणाचा जलस्तर २३९.२०० मीटरवर स्थिर ठेवून काल रात्री १० वाजेपासून सकाळी ६ वाजेपर्यंत सर्व ३३ वक्रदारे अर्ध्या मीटरने उघडण्यात आली होती. या ३३ वक्रदारातून ३,००० घनमीटर पाण्याचा विसर्ग प्रती सेकंद दराने नदी पात्रात होत होता.
सोमवारी सकाळपासून पाऊस कमी झाल्यामुळे सकाळी ६ नंतर वक्रदारे कमी करून १५ वक्रदारे अर्ध्या मीटरने उघडण्यात आली आहेत. धरणाचा जलस्तर २३९.२०० मीटर आहे. (वार्ताहर)