शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
2
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
3
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
4
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
5
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
6
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
7
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
8
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
9
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
10
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
11
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
12
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
13
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
14
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
15
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
16
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
17
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
18
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
19
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
20
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर

जिल्ह्यातील ३२ हजार व्यक्तींनी अखेर कोरोनाला हरवून दाखवलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:35 IST

भंडारा : कोरोनाचा संसर्ग वाढत असताना सर्वांच्या मनात भीती निर्माण होणे साहजिक आहे; परंतु पाॅझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांचे ...

भंडारा : कोरोनाचा संसर्ग वाढत असताना सर्वांच्या मनात भीती निर्माण होणे साहजिक आहे; परंतु पाॅझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. त्या आकड्यांकडे कधीच लक्ष जात नाही. भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत ३१ हजार ९४८ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. खऱ्या अर्थाने त्यांनी कोरोनाला हरविले आहे.

भंडारा जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण २७ एप्रिल २०२० रोजी आढळला. त्यानंतर अत्यंत संथगतीने रुग्णांची संख्या वाढत गेली. महिनाभरात रुग्णांची संख्या वेगाने वाढली असली तरी त्याच वेगाने कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख १० हजार ७५० व्यक्तींनी कोरोना चाचणी केली. त्यापैकी २ लाख ६६ हजार ७९७ व्यक्ती निगेटिव्ह आढळून आल्या, तर ४३ हजार ९५३ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळल्या आहेत. नकारात्मक विचार सोडन सकारात्मक विचार केल्यास कोरोनावर मात करता येते. हा कोरोनामुक्त झालेल्या जिल्ह्यातील अनेकांचा अनुभव आहे. कोरोना झाला तरी घाबरून न जाता योग्य उपचार केले, तर अवघ्या १५ दिवसांत ठणठणीत बरे होता येते.

जिल्ह्याचा पाॅझिटिव्हिटी रेट झाला कमी

जिल्ह्यात सध्या पाॅझिटिव्हिटीचा रेट १४.१४ टक्के आहे. पाॅझिटिव्हिटी रेट कमी होत असल्याचे दिसते.

कोरोनाच्या संसर्गाने सर्वच जण भयभीत दिसत आहेत. कोरोना झाल्यास आपल्यावर योग्य वेळी उपचार होतील काय, अशी अनेकांच्या मनात शंका निर्माण होत आहे. मात्र, भंडारा जिल्ह्यात खासगी आणि शासकीय रुग्णालयामध्ये पुरेशी व्यवस्था असून, कोविड केअर सेंटरमध्येही योग्य मार्गदर्शन केले जाते.

क्वारंटाइन काय असते, हे अवघ्या १४ दिवसांत चांगलेच कळले. कोविड केअर सेंटरमध्ये असतानाही हे दिवस कसे संपतील याचीच प्रतीक्षा होती. नकारात्मक येणाऱ्या वार्ता मनावर न घेता सकारात्मक दृष्टिकोनातून प्रत्येकानेच विचार करायला हवा. कोरोनाला हरविण्यासाठी मानसिकरीत्याही सक्षम असणे अत्यंत गरजेचे आहे, असेच मला वाटते. औषधांचे सेवन नियमित करावे. मात्र, सामाजिक जाणिवेची जाण कधीही विसरू नये, तरच आपण तग धरू शकतो.

-महेश गणवीर, कोरोनामुक्त

सातत्याने वाढत असलेले आकडे मनाला भेडसावून सोडत होते. मनात भीती येऊ दिली नाही. मन खचले तरी आप्तस्वकीयांशी फोनवर चार वेळा बोललो. आपल्यांचा धीर खूप बळ देऊन गेला. कोविड ब्लाॅकमध्ये घडणाऱ्या घटनांनी आपल्यासोबतही असेच होणार, ही भावना कधीही बाळगू नये. आपल्या डाॅक्टरांवर व उपचारावर विश्वास ठेवा. कोरोनाला हरविणे थोडे कठीण असले तरी अशक्य बाब नाही. सध्या मी स्वस्थ असून आताही सातत्याने काळजी घेत आहे.

-यादोराव तोंडरे, कोरोनामुक्त

कोरोना आता पूर्णत: सायकोसीस झाला आहे. नागरिकांनी मनात आता कुठलीही भीती न बाळगता उपचाराला सामोरे जावे. कोरोनाला हरविण्यासाठी मानसिकरीत्या सक्षम होण्याची खरी गरज आहे. अमका व्यक्ती कोरोनाने दगावला यापेक्षा आपण किती लवकर बरे होऊ, असाच विचार सातत्याने आपल्या मनावर बिंबवायला हवा.

-डाॅ. रत्नाकर बांडेबुचे,

मानसोपचारतज्ज्ञ, भंडारा