शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

जिल्ह्यातील ३२ हजार व्यक्तींनी अखेर कोरोनाला हरवून दाखवलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 05:00 IST

जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण २७ एप्रिल २०२० रोजी आढळला. त्यानंतर अत्यंत संथगतीने रुग्णांची संख्या वाढत गेली. महिनाभरात रुग्णांची संख्या वेगाने वाढली असली तरी त्याच वेगाने कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख १० हजार ७५० व्यक्तींनी कोरोना चाचणी केली. त्यापैकी २ लाख ६६ हजार ७९७ व्यक्ती निगेटिव्ह आढळून आल्या, तर ४३ हजार ९५३ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळल्या आहेत.

ठळक मुद्देबाधितांपेक्षा बरे होण्याचे प्रमाण वाढू लागले

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोनाचा संसर्ग वाढत असताना सर्वांच्या मनात भीती निर्माण होणे साहजिक आहे; परंतु पाॅझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. त्या आकड्यांकडे कधीच लक्ष जात नाही. भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत ३१ हजार ९४८ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. खऱ्या अर्थाने त्यांनी कोरोनाला हरविले आहे. जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण २७ एप्रिल २०२० रोजी आढळला. त्यानंतर अत्यंत संथगतीने रुग्णांची संख्या वाढत गेली. महिनाभरात रुग्णांची संख्या वेगाने वाढली असली तरी त्याच वेगाने कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख १० हजार ७५० व्यक्तींनी कोरोना चाचणी केली. त्यापैकी २ लाख ६६ हजार ७९७ व्यक्ती निगेटिव्ह आढळून आल्या, तर ४३ हजार ९५३ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळल्या आहेत. नकारात्मक विचार सोडन सकारात्मक विचार केल्यास कोरोनावर मात करता येते. हा कोरोनामुक्त झालेल्यांचा अनुभव आहे. कोरोना झाला तरी घाबरून न जाता योग्य उपचार केले, तर अवघ्या १५ दिवसांत ठणठणीत बरे होता येते. 

घाबरु नका, आम्हीही हरविले आहे

क्वारंटाइन काय असते, हे अवघ्या १४ दिवसांत चांगलेच कळले. कोविड केअर सेंटरमध्ये असतानाही हे दिवस कसे संपतील याचीच प्रतीक्षा होती. नकारात्मक येणाऱ्या वार्ता मनावर न घेता सकारात्मक दृष्टिकोनातून प्रत्येकानेच विचार करायला हवा. कोरोनाला हरविण्यासाठी मानसिकरीत्याही सक्षम असणे अत्यंत गरजेचे आहे, असेच मला वाटते. औषधांचे सेवन नियमित करावे. मात्र, सामाजिक जाणिवेची जाण कधीही विसरू नये, तरच आपण तग धरू शकतो. -महेश गणवीर, कोरोनामुक्त 

सातत्याने वाढत असलेले आकडे मनाला भेडसावून सोडत होते. मनात भीती येऊ दिली नाही. मन खचले तरी आप्तस्वकीयांशी फोनवर चार वेळा बोललो. आपल्यांचा धीर खूप बळ देऊन गेला. कोविड ब्लाॅकमध्ये घडणाऱ्या घटनांनी आपल्यासोबतही असेच होणार, ही भावना कधीही बाळगू नये. आपल्या डाॅक्टरांवर व उपचारावर विश्वास ठेवा. कोरोनाला हरविणे थोडे कठीण असले तरी अशक्य बाब नाही. सध्या मी स्वस्थ असून आताही सातत्याने काळजी घेत आहे. -यादोराव तोंडरे, कोरोनामुक्त

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या