जिल्ह्यात ३२ पॉझिटिव्ह; २२ जणांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:33 IST2021-03-06T04:33:46+5:302021-03-06T04:33:46+5:30
जिल्ह्यात १५७१ व्यक्तींच्या घश्यातील स्वॅबचे नमुने शुक्रवारी तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यात भंडारा १७, तुमसर चार, लाखनी सहा, पवनी ...

जिल्ह्यात ३२ पॉझिटिव्ह; २२ जणांची कोरोनावर मात
जिल्ह्यात १५७१ व्यक्तींच्या घश्यातील स्वॅबचे नमुने शुक्रवारी तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यात भंडारा १७, तुमसर चार, लाखनी सहा, पवनी दोन, मोहाडी, साकोली आणि लाखांदूर येथे प्रत्येकी एक असे ३२ रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ३८ हजार ७७६ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी १३ हजार ८८४ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर १३ हजार २०७ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली. ३१० कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून, मृतांची संख्या ३२७ आहे.
कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी जनजागृती करण्यात येत असून, जिल्ह्यात कोरोनायोद्धांसह ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. आतापर्यंत १३ हजारांच्या वर व्यक्तींना कोराेना लस देण्यात आली आहे. नागरिकांनी कोरोनाची भीती न बाळगता चाचणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आहे. गत आठ दिवसात जिल्ह्यात कोरोनाने कुणाचाही मृत्यू झाला नसला तरी रुग्णांची संख्या मात्र वाढत असल्याचे दिसत आहे.