खरेदी-विक्री सहकारी संस्थेच्या निवडणुकीत ३२ उमेदवार रिंगणात
By Admin | Updated: February 7, 2017 00:23 IST2017-02-07T00:23:36+5:302017-02-07T00:23:36+5:30
साकोली तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीकडे लाखनी व साकोली तालुक्याच्या जनतेचे लक्ष लागले आहे.

खरेदी-विक्री सहकारी संस्थेच्या निवडणुकीत ३२ उमेदवार रिंगणात
१५ संचालकांची निवड होणार : १,०४३ मतदार, प्रतिष्ठेची निवडणूक
चंदन मोटघरे लाखनी
साकोली तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीकडे लाखनी व साकोली तालुक्याच्या जनतेचे लक्ष लागले आहे. लाखनी तालुक्यातील नावाजलेल्या सहकारी संस्थेची निवडणुक राजकीय दिग्गजासाठी प्रतिष्ठेची झाली आहे.
उमेदवार मतदारांच्या घरी मतांचा जोगावा मागण्यासाठी साकोली व लाखनी तालुका पिंजुन काढत आहेत.
खविसची निवडणुक १२ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. लाखनी तालुक्यातील मतदार समर्थ विद्यालय व साकोली तालुक्यातील मतदार नंदलाल पाटील कापगते विद्यालयात मतदानाचा हक्क बजावणार आहे. वैयक्तिक गटाकरिता ९६२ सभासद मतदान करणार आहेत. तर संस्था प्रतिनिधी गटात ८१ मतदार मतदान करणार आहेत.
निवडणुकीसाठी ३२ उमेदवार रिंगणात आहेत. १५ संचालक निवडुन दयावयाचे आहेत. काँग्रेस प्रणित शेतकरी परिवर्तन पॅनेल व भाजपा मित्र गट समर्थित शेतकरी विकास सहकारी पॅनलचे उमेदवार समोरासमोर असून दोन उमेदवार अपक्ष आहेत.
वैयक्तिक सभासद प्रतिनिधी गटात शेतकरी परिवर्तन पॅनलचे गोपाल आगाशे, खिरोज गायधनी, ताराचंद जांगळे, झिबल बावनकुळे, माधवराव भोयर, सुरेश वाघाये, घनश्याम खेडीकर, लिलाधर गि-हेपुंजे, हरीदास पडोळे, भेनाथ मोहतुरे, मदन वाघाये, धोंडु वंजारी, नित्यानंद ठवकर, विनोद हनवतकर, १४ उमेदवार आहेत. महिला प्रवर्गातून देवका निर्वाण सिंधू बेलखाडे, यमुबाई गायधनी, सिरोजिनी वंजारी हे ४ उमेदवार संस्था प्रतिनिधी गटातून रामकृष्ण कापसे, शैलेश गजभिये, अशोक चेटुले, लिलाधर पटले, देवचंद करंजेकर, दिलीप राघोर्ते, संजय शिवनकर, केशव सेलोकर असे ८ उमेदवार रिंगणात आहेत. इतर मागासवर्गीय गटात मनिराम बोळणे, माधव वंजारी, अनुसूचित जाती जमाती गटात विशाल तिरपुडे, भजनदास बोरकर, विमुक्त भटक्या जाती/जमाती गटातून भागवत नान्हे, नामदेव राऊत निवडणूक मैदानात आहेत.
उमेदवार प्रचारार्थ प्रत्येक गावातील मतदारांकडे फिरत आहेत. यापूर्वी खविसची निवडणुक अविरोध झाली होती. यावर्षी निवडणूक अविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात आले. पण त्याला यश मिळाले नाही. संचालक पद प्राप्त करण्यासाठी उमेदवारांची चढाओढ आहे. तालुक्यातील जनतेचे लक्ष सदर निवडणुकीकडे लागले आहे. शेतक-यांच्या हितासाठी काम करणारी संस्था कर्चाच्या विळख्यात सापडलेली होती.