रिसामा येथील ३०९ कुटुंबांना मिळणार आखीवपत्रिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:34 IST2021-03-19T04:34:28+5:302021-03-19T04:34:28+5:30

आमगाव तालुक्यातील भूमीअभिलेख कार्यालयात जुन्याच सिटी सर्व्हेनुसार तालुक्यातील मिळकती (आखीव पत्रिका) कायम होत्या. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांतील कित्येक ...

309 families in Risama will get Akhivapatra | रिसामा येथील ३०९ कुटुंबांना मिळणार आखीवपत्रिका

रिसामा येथील ३०९ कुटुंबांना मिळणार आखीवपत्रिका

आमगाव तालुक्यातील भूमीअभिलेख कार्यालयात जुन्याच सिटी सर्व्हेनुसार तालुक्यातील मिळकती (आखीव पत्रिका) कायम होत्या. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांतील कित्येक प्लॉटधारकांचे नाव आखीवपत्रिकेवर नव्हते.

तालुक्यातील मौजा रिसामा येथील कित्येक घरमालकांचे आखीवपत्रिकेवर नाव नसल्याने बांधकाम नकाशा मंजूर करण्यात अडचणी निर्माण होऊ लागल्या. स्वतःच्या मालकीचे घर असूनही त्यांची घरावर मालकी नाही. घर विकणेही शक्य नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून न्याय मिळावा, यासाठी या भागातील नागरिकांचा लढा सुरू होता. १९९४ च्या शासन निर्णयानुसार भूमीअभिलेख विभागाची तालुकास्तरावर पुनर्रचना करण्यात आली. त्या अनुषंगाने नागपूर विभागातील आमगाव तालुक्यातील मौजा रिसामा गावच्या सुटलेल्या ३०९ मिळकती प्रस्तावित होत्या.

ही बाब रिसामा येथील से. नि. शिक्षक श्यामराव बहेकार, काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष संजय बहेकार, महिला तालुकाध्यक्ष छबू उके, बाजार समिती उपसभापती रविदत्त अग्रवाल, तालुका सचिव महेश उके, शहराध्यक्ष अजय खेतान, सरपंच राजकुमार मोदी, रामेश्वर श्यामकुवर, उज्ज्वल ठाकूर यांनी आ. सहेषराम कोरोटे यांच्या लक्षात आणून दिली.याप्रकरणी आ. कोरोटे यांनी अपर जमाबंदी आयुक्त (पुणे) यांच्याकडे पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. अपर जमाबंदी आयुक्तांच्या १५ मार्च २०२१ च्या आदेशानुसार ३०९ मिळकत समाविष्ट करण्याबाबत मंजुरी मिळाली.

आ. कोरोटे यांच्या प्रयत्नांनी ३०९ मिळकती कायम करण्यात आल्या असून, लवकरच ३०९ कुटुंबीयांना आखीवपत्रिका वाटप करण्यात येणार आहे.

Web Title: 309 families in Risama will get Akhivapatra