शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

उस दर वाढीसाठी ३०० शेतकरी धडकले साखर कारखान्यावर; ...तर कारखान्याला उस न देण्याचा निर्धार

By युवराज गोमास | Updated: October 26, 2023 15:15 IST

दरम्यान भाव वाढ न दिल्यास कारखान्याला उस न देण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

भंडारा : जिल्ह्यातील देव्हाडा स्थित एकमेव मानस ॲग्रो साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामासाठी उसाला २१०० रूपये प्रति मेट्रीक टन भाव जाहिर केल्याने उस उत्पादक शेतकऱ्यांत असंतोषाची भावना होती. २५ ऑक्टाेंबर रोजी शेतकऱ्यांनी साखर कारखान्यावर आक्रोश मोर्चा काढला. मात्र, कारखान्याचे उपाध्यक्ष भोजराम कापगते यांनी समाधानकारक न करता काढता पाय घेतल्याने शेतकरी चांगलेच भडकले होते. दरम्यान भाव वाढ न दिल्यास कारखान्याला उस न देण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

मोहाडी तालुक्यातील देव्हाडा येथील मानस ॲग्रो साखर कारखान्यावर ऊस दर वाढ मागणीसाठी ३०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आक्रोश मोर्चा काढला. कारखाना गेटवर आंदोलक शेतकरी दिवसभर ठिय्या मांडून होते. कारखाना प्रशासनाने राज्यातील इतर कारखान्याच्या तुलनेत अत्यल्प भाव जाहिर केल्याचा निषेध व्यक्त केला. उसाला २१०० नव्हे तर २७०० रूपये भाव जाहिर करण्यात यावा, अशी मागणी केली. देव्हाडा येथील कारखाना शेतकऱ्यावर का अन्याय करीत आहे, असा प्रश्न विचारण्यात आला.

कमी भावामुळे उत्पादन खर्च निघणार नाही, यामुळे कुटुंबाचे भरणपोषण व शैक्षणिक तसेच आरोग्य विषयक समस्यांना तोंड द्यावे लागेल, अशी भुमिका घेत शेतकऱ्यांनी मागण्यांसंबंधीचे निवेदन १४ ऑगस्ट २०२३ रोजी शेतकऱ्यांनी दिले होते. पण, यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नव्हता. त्यामुळे उस उत्पादकांनी कारखाना प्रशासनाविरोधात घोषणा देत मोर्चा काढला, आपली मागणी रेटून धरली. परंतु, तोडगा न निघाल्याने आंदोलन फसल्याची चर्चा परिसरात व्यक्त होत आहे.

आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी यादोराव मूंगमोडे जांभोरा, मनीष परसूरामकर खोड शिवनी, मुकेश गहाणे हेट्टी, योगराज पारधी मलुटोला, हेमराज हातझाडे सोमलपुर, अनिल लंजे बोलादा, अशोक बोरकर पाथरी, देवेश कशिवार मुरपार, यशवंत कापगते उमझरी यांनी केले.

तोडगा न काढता पळाले उपाध्यक्षआंदोलनादरम्यान कारखान्याचे उपाध्यक्ष भोजराम कापगते यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधतांना कुठलेही ठोस आश्वासन दिले नाही. वारंवार टोलवटोलवी करण्याचा प्रयत्न केला. तसेच कारखाना प्रशासनाविरोधात शेतकऱ्यांचा वाढता आक्रोश बघता त्यांनी पळ काढल्याचे आंदोलक शेतकरी यादोराव मुंगमोडे यांनी कळविले.

तर...बॉयलर प्रज्वलनावेळी आंदोलन करूकारखाना प्रशासन दरवाढी बाबतील मायेची फुंकर घालून दरवाढीसंबंधात योग्य तो निर्णय घेतील, अशी अपेक्षा आंदोलक शेतकऱ्यांत होती. परंतु, कोणताही निर्णय न घेता उपाध्यक्षांनी काढता पाय घेतल्याने आंदोलक चांगलेच भडकले आहेत. शेतकऱ्यांच्या न्यायासाठी बॉयलर प्रज्वलन वेळी आंदोलन करण्यात येईल, असे सांगण्यात आले. 

टॅग्स :FarmerशेतकरीSugar factoryसाखर कारखाने