भंडारा ते तुमसर ३० किलोमीटरच्या रस्त्यासाठी लागतो वाहन चालकांना तब्बल ५० मिनीटांचा कालावधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 05:00 AM2020-11-27T05:00:00+5:302020-11-27T05:00:31+5:30

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येत असलेला भंडारा - तुमसर हा राज्य मार्गाच्या विस्तारीकरणाचे घोडे दशकभरापासून लटकले आहे. मध्यंतरीच्या काळात या रस्त्याच्या विस्तारीकरणाचे काम लवकरच सुरू होणार, अशी आशा घोषणाही करण्यात आली होती मात्र माशी कुठे शिंकली कुणास ठाऊक, धाबा पर्यंतच्या वळणावर पर्यंतचा रस्ता विस्तारित करण्यात आला. 

The 30 km road from Bhandara to Tumsar takes about 50 minutes | भंडारा ते तुमसर ३० किलोमीटरच्या रस्त्यासाठी लागतो वाहन चालकांना तब्बल ५० मिनीटांचा कालावधी

भंडारा ते तुमसर ३० किलोमीटरच्या रस्त्यासाठी लागतो वाहन चालकांना तब्बल ५० मिनीटांचा कालावधी

googlenewsNext
ठळक मुद्देरस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य : सार्वजनिक बांधकाम विभागाचा कारभार

  लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :  जिल्ह्याचे मुख्यालय लाभलेल्या भंडारा शहरातून राष्ट्रीय महामार्गासह तीन राज्यमार्गही संलग्नित आहेत. मात्र यापैकी भंडारा ते तुमसर या आंतरराज्यीय राज्यमार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. भंडारा शहर ते तुमसरकडे जाणाऱ्या या राज्य मार्गाच्या ३० किलोमीटरच्या प्रवासासाठी चक्क ५० मिनिटांचा कालावधी लागत आहे. परिणामी खड्डे पडलेले रस्ते ही बाब यासाठी कारणीभूत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येत असलेला भंडारा - तुमसर हा राज्य मार्गाच्या विस्तारीकरणाचे घोडे दशकभरापासून लटकले आहे. मध्यंतरीच्या काळात या रस्त्याच्या विस्तारीकरणाचे काम लवकरच सुरू होणार, अशी आशा घोषणाही करण्यात आली होती मात्र माशी कुठे शिंकली कुणास ठाऊक, धाबा पर्यंतच्या वळणावर पर्यंतचा रस्ता विस्तारित करण्यात आला. 
मात्र त्यानंतर हा रस्ता अजूनही तसाच आहे भंडारा शहरातील शास्त्री चौक ते आयटीआय, आयटीआय ते वरठी व त्यानंतर वरठी ते मोहाडी पर्यंतचा रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. ठिकाणी शेकडो लहान मोठे खड्डे असून वाहतूकदार जीव धोक्यात घालून प्रवास करीत आहेत.
या समस्येकडे बांधकाम विभाग लक्ष देणार काय अशी मागणी नागरिक करीत आहेत. जिल्ह्यातील अन्य काही रस्त्यांचीही अशीच अवस्था आहे, मात्र दुरूस्ती किंवा डागडुजीकडे लक्ष दिले जात नाही. परिणामी अपघातांचे प्रमाणही वाढल्याचे दिसून येत आहे.

 भंडारा तुमसर राज्यमार्गावर दुचाकीने प्रवास करणे म्हणजे जीव मुठीत घेऊन जाण्यासारखे आहे. या रस्त्यावर असंख्य खड्डे असून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. दशकभरापासून हा प्रश्न अधांतरी आहे.  सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन हा मार्ग त्वरित दुरुस्त करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. मात्र कुणी लक्षदेत नाहीत.
अश्विन साखरे, वाहनचालक

वाहन होते स्लिप
राज्यमार्ग असलेल्या भंडारा ते तुमसर या मार्गाची अत्यंत दूरवस्था झाली आहे. लहान-लहान खड्डयांमुळे दररोज लहानमोठे अपघात घडत आहेत. विशेषत: दुचाकी वाहनधारकांचे वाहन स्लिप होण्याचे प्रमाणही वाढले आहे
दुसरीकडे नियमांचे पालन होत नसल्याने त्याचे खापरही एकमेकांवर फोडले जाते. 

रस्त्यावर असते   दिवसभर वर्दळ
भंडारा ते तुमसर हा राज्यमार्ग असून याच मार्गावरून नंतर आंतरराज्य सीमा सुरू होते. तुमसर तालुक्यात अनेक लहान-मोठ्या कंपनी असून भंडारा जिल्हा मार्गे नागपूरला जाण्यासाठी या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. याला संलग्नित असलेले बायपास रस्त्यांचीही अक्षरशः चाळण झाली आहे. याशिवाय शेकडो नागरिक व प्रवासी याच रस्त्याने मोठ्या प्रमाणात ये-जा करीत असतात. परिणामी या रस्त्याची डागडुजी तात्काळ होणे अत्यंत आवश्यक झाले आहे. सार्वजिनक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज असल्याचे वाहन चालक सांगत आहेत.

Web Title: The 30 km road from Bhandara to Tumsar takes about 50 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.