जिल्ह्यात २९ शाळा शौचालयाविना
By Admin | Updated: December 11, 2014 23:00 IST2014-12-11T23:00:50+5:302014-12-11T23:00:50+5:30
‘स्वच्छ व सुंदर भारत’ ही संकल्पना राबविण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. मात्र जिल्हा परिषदच्या २९ शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी शौच्छालय नसल्याचे तर यातील सहा शाळा शौचालयाचा वापर

जिल्ह्यात २९ शाळा शौचालयाविना
२५.४० लाखांचा निधी मंजूर : जानेवारीपूर्वी बांधकाम पूर्ण करण्याचे निर्देश
भंडारा : ‘स्वच्छ व सुंदर भारत’ ही संकल्पना राबविण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. मात्र जिल्हा परिषदच्या २९ शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी शौच्छालय नसल्याचे तर यातील सहा शाळा शौचालयाचा वापर करीत नसल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे.
निर्मल व स्वच्छ भारत योजनेला देशात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी शाळेत शौचालये असावे, असे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत. या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये शौचालय बांधण्यात आले आहे. शिक्षण विभागात कार्यरत सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून अनेक नाविन्य उपक्रम राबविण्यात येत आहे.
जिल्हा परिषदेच्या सर्वशिक्षा अभियानाने नुकतेच यु-डायसच्या माध्यमातून शौचालयाची माहिती जाणून घेतली. यात जिल्ह्यातील २९ शाळांमध्ये शौचालय नसल्याची बाब उघडकीला आली आहे. त्यानुसार वरिष्ठ स्तरावर याचा पाठपुरावा करून शौचालय नसलेल्या शाळांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.
२९ शाळांपैकी सहा शाळांमध्ये शौचालयाचे बांधकाम करण्यात आले असूनही त्यांचा वापर करण्यात येत नाही. यामुळे येथील शौचालय वापराविना अडगळीत पडले आहे. या शौचालयाचा वापर अन्य शालेय साहित्य ठेवण्यासाठी करण्यात येत असल्याने ते कुलूपबंद असल्याचेही उघडकीस आले आहे.
शौचालय नसलेल्या शाळांमध्ये २१ मुलांचे तर दोन मुलींचे असून उर्वरीत सहा शौचालये वापरात नाहीत. मुलांसाठी बांधावयाच्या शौचालयासाठी प्रत्येकी एक लाख रूपये तर मुलींच्या शौचालयासाठी प्रत्येकी ७० हजार रूपये शासनाकडून मंजूर करण्यात आले आहे. वापरात नसलेल्या शौचालयाच्या दुरूस्तीसाठी अंदाजपत्रक तयार करून तशी रक्कम देण्यात आली आहे.
मुलांच्या शौचालयासाठी २१ लाख तर मुलांच्या शौचालयासाठी १.४० लाख तर वापरात नसलेल्या शौचालयासाठी ३ लाख असे २५.४० लाख रुपयांचा निधी सर्वशिक्षा अभियानाला प्राप्त झाला असून तो संबंधित शाळांना देण्यात आला आहे. (शहर प्रतिनिधी)