२८ गावांना बसतो पुराचा तडाखा

By Admin | Updated: August 9, 2014 00:48 IST2014-08-09T00:48:42+5:302014-08-09T00:48:42+5:30

लाखांदूर तालुक्याला पावसाळ्यात चुलबंद व वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे मोठे नुकसान सहन करावे लागते.

28 villages sit tight for the flood | २८ गावांना बसतो पुराचा तडाखा

२८ गावांना बसतो पुराचा तडाखा

लाखांदूर : लाखांदूर तालुक्याला पावसाळ्यात चुलबंद व वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे मोठे नुकसान सहन करावे लागते. चुलबंद नदीकाठावरील १७ तर वैनगंगा नदीकाठावरील ११ गावांना पुराचा तडाखा बसतो.
वाहतुकीच्या दृष्टीने साकोली पवनी, पवनी वडसा-अर्जुनी मोर. ही लाखांदुरला जोडणारी मार्ग बंद होतात. विविध नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी पूर्व तयारी करून अशी आपत्ती उद्भवल्यास कमीत कमी जीवीत व वित्त हानी होईल या दृष्टीकोांतून महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली असती तरी त्या २८ गावांना पुन्हा पुराचा तडाखा बसणार आहे.
भंडारा शहराजवळील पाणी पातळीबाबत इशारा पातळी ९ मीटर आणि धोक्याची पातळी ०९.५० मिटर एवढी आहे. लाखांदूर तालुक्याचा दहा वर्षाचा पुराचा आलेख बघितला असता १९९४ मध्ये मोठा पूर आला होता. त्यावेळी पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीच्या वर म्हणजेच १४.१० मिटरपर्यंत पोहचली होती. दि. १४ ते १७ सप्टेंबर २००५, १३ ते १७ आॅगस्ट २००६ या दरम्यान पूरसदृष्य परिस्थिती ओढावली होती. विविध आपत्ती संदर्भात प्रतिबंध निवारण पूर्वतयारी प्रतिसाद मदतचे पुनर्वसनाच्या बाबी सुव्यवस्थितपणे हाताळण्यासाठी केंद्र शासनाने आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अमलात आणलेला आहे. या कायद्यातील तरतुदीस अनुसरुन महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्रधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे.
तालुक्यातील नदीकाठावरील त्या २८ गावांना मदरवर्षी पुराचा तडाखा सहन करावा लागतो. यात जीवीतहानीपेक्षा शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. वैनगंगा नदीमुळे ११ तर चुलबंद नदीमुळे १७ गावे बाधीत होतात. यामध्ये आवळी व खोलमारा बु. या दोन गावांचे पुरामुळे इतर गावांशी संपर्क तुडतो. ही दोन्ही गाव पुनर्वसीत आहेत. परंतु पुनर्वसन करताना शासनाने पूर्णपणे मदत कार्य पूर्ण न केल्याने आमचे पुनर्वसन झालेच नाही असे या गावातील नागरिकांचे म्हणणे आहे. त्याशिवाय चुलबंद नदी नाले धरणामुळे नुकसान पोहचणाऱ्या आबादी गावांची संख्या ही ९ आहे. तर गोसे खुर्द धरणाच्या डाव्या कालव्यामुळे सुद्धा हजारो हेक्टर धानपिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान होत असताना शासनाने ही बाब गंभीरतेने घेतली नसल्याने शेतकऱ्यांना आल्या दुष्काळाचा सामना मागील ४ वर्षापासून सहन करावा लागत आहे. तालुकास्तरावर आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम घेण्याकरिता लाखांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. तहसील कार्यालय लाखांदूर येथे बिनतारी संदेश यंत्रणा उपलब्ध असून शासनाकडून सदर यंत्रणा पूर्ववत कार्यान्वित करण्यात आली आहे.
वैनगंगा नदीमुळे प्रभावित गाव इटान, विरली बु. नांदेड, दोनाड, खैरना, मोहरना, गवराळा, टेंभरी, विहिरगाव, डांभेविरली, सावळी, सोनी, धर्मापुरी, पाऊलदवना, बोथली, परसोडी, मांढळ, किन्ही, आसोला, आथली, भागडी, खैरी पट, चप्राड, किनाळा, लाखांदूर, चिचोली, खोलमारा, बारव्हा यांचा समावेश आहे..
आवळी गावाला पुराचा सर्वात जास्त तडाखा बसतो. आरोग्याचाही प्रश्न डोकेवर काढून साथीच्या रोगाचा सामना करावा लागतो. तालुक्याच्या ठिकाणी मदत शिबिरे घेण्यात येतात. यावर्षी पुरामुळे होणारी जिवीत व वित्तहानी रोखण्यासाठी ग्रामस्तरावर व तालुका स्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या. त्याकरिता लाखांदूरचे तहसीलदार विजय पवार, नायब तहसीलदार वंजारी, कांबळे यांनी सभा घेऊन त्या २६ गावांना सूचना दिल्या आहेत. पुरामुळे होणारे धोके टाळण्यापेक्षा शासनाने एकदा त्या गावाचा पुनर्वसनाचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी आहे. पुरपरिस्थिती उद्भल्यास जीवीत हानी होऊ नये तसेच वित्त हानीचे प्रमाण कमीत कमी असावे आणि पुरबाधीत नागरिकांना मदत व आधार देऊन त्यांचे जीवन पुर्ववत करण्यास मदत करणे यास दृष्टीने प्रशासनाने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे आवाहन तहसीलदार विजय पवार व पोलीस निरीक्षक प्रशांत कुळकर्णी यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: 28 villages sit tight for the flood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.