२८ गावे अंधारात

By Admin | Updated: August 24, 2014 23:19 IST2014-08-24T23:19:14+5:302014-08-24T23:19:14+5:30

तांत्रिक बिघाड व नवीन उपकेंद्र लावण्याच्या नावावर मागील काही दिवसापासून वीज पुरवठा खंडीत करण्याचे सत्र सुरु झाले आहे. शुक्रवारी रात्री दोन ते शनिवारी दुपारी दोनपर्यंत १२ तास देव्हाडी

28 villages in the dark | २८ गावे अंधारात

२८ गावे अंधारात

तांत्रिक कारण : १२ तास वीज खंडीत
तुमसर : तांत्रिक बिघाड व नवीन उपकेंद्र लावण्याच्या नावावर मागील काही दिवसापासून वीज पुरवठा खंडीत करण्याचे सत्र सुरु झाले आहे. शुक्रवारी रात्री दोन ते शनिवारी दुपारी दोनपर्यंत १२ तास देव्हाडी परिसरातील २५ ते ३० गावात वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. कार्यरत कर्मचाऱ्यांचे वाढलेले वय व रिक्त पदे न भरल्याने कामात व्यत्यय येत असलयची कबुली वीज वितरण कंपनीकडून देण्यात येत आहे.
तांत्रिक बिघाड येणे आता नित्याचेच झाले आहे. आयुष्य संपलेली उपकरणे सुरु आहेत. कार्यरत कर्मचाऱ्यांचे वय वाढल्याने त्यांच्यात शिथिलता आली आहे. व्यसनाच्या आहारी गेल्याची कबुली वरिष्ठ अभियंत्याने दिली. वय वाढल्याने खांबावर चढता येत नाही. शुक्रवारी वादळ वाऱ्यासह पाऊस पडला. क्षणातच वीज पुरवठा खंडीत झाला. देव्हाडी परिसरातील २५ ते ३० गावांचा वीज पुरवठा खंडीत झाला होता. तीन ठिकाणी तांत्रिक बिघाड झाल्याचे स्थानिक अभियंता गवते यांनी सांगितले. नवीन उपकेंद्र तुमसर येथे तयार करण्यात येत आहे. तत्पूर्वी नवीन केबल टाकणे व तांत्रिक कामे पंधरवाड्यापासून सुरु आहेत. त्यामुळे तुमसर शहर व परिसरात वीज पुरवठा खंडीत केला जात असल्याची माहिती अभियंता गडपायले यांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: 28 villages in the dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.