जिल्ह्यात रविवारी २८ रुग्णांना डिस्चार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:41 IST2021-02-05T08:41:37+5:302021-02-05T08:41:37+5:30

रविवारी ४३२ व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी ८ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत १ ...

28 patients discharged in the district on Sunday | जिल्ह्यात रविवारी २८ रुग्णांना डिस्चार्ज

जिल्ह्यात रविवारी २८ रुग्णांना डिस्चार्ज

रविवारी ४३२ व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी ८ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत १ लाख १८ हजार ८४६ व्यक्तींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात १३,२२२ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळले.

जिल्ह्यात रविवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यामध्ये भंडारा तालुक्यातील ६, मोहाडी १, साकोली तालुक्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे. १५९ सक्रिय रुग्ण आहेत. कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला असून, जिल्ह्यात कोरोनामुळे मृतांची संख्या एकूण ३२२ झाली आहे. जिल्ह्याचा मृत्युदर ०२.४२ टक्के एवढा आहे. शासकीय व खासगी रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्रिस्क्राइब करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.

Web Title: 28 patients discharged in the district on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.