मानेगाव सडक येथे कत्तलीस जाणाऱ्या २८ जनावरांची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 05:00 IST2020-06-23T05:00:00+5:302020-06-23T05:00:51+5:30
पोलिसांनी जप्त करून २८ जनावरांची सुटका केली. ही कारवाई लाखनी तालुक्यातील मानेगाव सडक येथे रविवारी करण्यात आली. याप्रकरणी ट्रक चालकासह दोघांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

मानेगाव सडक येथे कत्तलीस जाणाऱ्या २८ जनावरांची सुटका
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कत्तलीसाठी निर्दयपणे कोंबून जनावरांना घेवून जाणारा ट्रक लाखनी पोलिसांनी जप्त करून २८ जनावरांची सुटका केली. ही कारवाई लाखनी तालुक्यातील मानेगाव सडक येथे रविवारी करण्यात आली. याप्रकरणी ट्रक चालकासह दोघांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
मोहम्मद आरिफ मिसार अहमद (२७) रा. नागपूर आणि ट्रक चालक तिलक (४०) रा. नागपूर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. लाखनी पोलीस गस्तीवर असताना मानेगाव सडक येथे एका ट्रकवर संशय बळावला. ट्रक थांबून तपासणी केली असता त्यात निर्दयपणे २० गायी व २० गोºहे वाहतूक करीत असल्याचे आढळून आले. परवान्याबाबत विचारणा केली असता कोणताही परवाना आढळून आला नाही. त्यावरून पोलिसांनी ही जनावरे ताब्यात घेवून त्यांची रवानगी पिंपळगाव कोहळी येथील सुकृत गोशाळेत केली.
सदर जनावराची किंमत दोन लाख ४० हजार, ट्रकच किंमत पाच लाख रूपये आणि ताडपत्रीची किंमत दीड हजार रूपये असा सात लाख ४१ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.