२.७९ लाख रूपयांची दारू पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:01 IST2017-09-30T00:01:00+5:302017-09-30T00:01:10+5:30
दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात भंडारा जिल्ह्यातून अवैध दारू पुरवठा सुरू आहे. काल गुरूवारला रात्री आणि आज शुक्रवारला केलेल्या दोन कारवाईत अनुक्रमे १.२६ लाख रूपयांची देशी दारू तर.....

२.७९ लाख रूपयांची दारू पकडली
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात भंडारा जिल्ह्यातून अवैध दारू पुरवठा सुरू आहे. काल गुरूवारला रात्री आणि आज शुक्रवारला केलेल्या दोन कारवाईत अनुक्रमे १.२६ लाख रूपयांची देशी दारू तर १.५३ लाख रूपयांची विदेशी दारू अशी एकूण २.७९ लाख रूपयांची दारू पकडण्यात आली. पहिल्या कारवाईत एकाला अटक तर दोन आरोपी फरार आहेत दुसºया कारवाईत तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
भावडमार्गे दारूची वाहतूक सुरू असल्याची माहिती लाखांदूर पोलिसांना रात्रीच मिळाली. पोलीस रात्रभर मासळ येथे दबा धरून बसल्यानंतर पहाटे भावडमार्गे चारचाकी वाहन थांबवून तपासणी केली असता ४४ पेट्या देशी दारू आढळून आली. या दारूची किंमत १ लाख २६ हजार रूपय ईतकी आहे. याप्रकरणी महेश किसन बोरकर रा. मालडोंगरी याला अटक केली असून दोन आरोपी फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. दारू पकडण्याची या आठवड्यातील ही चौथी कारवाई आहे.
दुसºया कारवाईत १ लाख ५३ हजार रूपयांची दारू जप्त करण्यात आली. लाखांदूर तालुक्यातील कान्हाळगाव शिवारात दुचाकीने दारूची वाहतूक करत असताना गस्तीवरील पोलिसांनी विदेशी दारू ३३ हजार ६०० रूपये व मुद्देमाल असा १ लाख ५३ हजाराची दारू जप्त करण्यात आली. यात तीन आरोपीना अटक करण्यात आली.
प्रमोद गिरडकर रा.दिवाण (खैरी), भुपेंद्र उद्धव झलके रा.खराशी, रितेश रमेश हुकरे रा. आसगाव असे अटक केलेल्यांची नावे आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक डी. डब्लू. मंडलवार, प्रेमलाल भोयर, अशोक मांदाळे, राजू पंचबुद्धे, सुरेश आगाशे, लोकेश ढोक, प्रफुल कठाने, विष्णू खंडाते, रवींद्र मुंजमकर, प्रमोद टेकाम, वासंती कावळे यांच्यासह लाखांदूर पोलिसांनी केली.