६४ रेल्वे प्रवाशांना २७ हजारांचा दंड

By Admin | Updated: August 7, 2016 00:17 IST2016-08-07T00:17:40+5:302016-08-07T00:17:40+5:30

तुमसर रोड रेल्वे स्थानकावर नियमभंग केल्याप्रकरणी ६४ प्रवाशांकडून २७ हजारांचा दंड वसुल करण्यात आला. ही कारवाई रेल्वे प्रशासनाच्या भरारी पथकाने केली.

27 lakh penalty for 64 passenger passengers | ६४ रेल्वे प्रवाशांना २७ हजारांचा दंड

६४ रेल्वे प्रवाशांना २७ हजारांचा दंड

तुमसर : तुमसर रोड रेल्वे स्थानकावर नियमभंग केल्याप्रकरणी ६४ प्रवाशांकडून २७ हजारांचा दंड वसुल करण्यात आला. ही कारवाई रेल्वे प्रशासनाच्या भरारी पथकाने केली. 
नागपूर रेल्वे पोलीस तथा वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांचे भरारी पथक तुमसर रोड रेल्वे स्थानकावर साध्या वेशात शुक्रवारी दाखल झाले होते. विना तिकीट प्रवास करणे, प्लॅटफार्मवर विना तिकीट प्रवेश करणे, रेल्वे ट्रॅक ओलांडणे, महिला प्रवाशी डब्ब्यातून पुरूष प्रवाशाने प्रवास करणे आदी कारणास्तव रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रवाशांना ताब्यात घेतले.
रेल्वे न्यायाधीश फड यांनी या सर्व ६४ प्रवाशांवर दंड आकारणी केली. ६४ प्रवाशांकडून २७ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. महिन्यातून सुमारे दोन ते चारदा भरारी पथक कारवाई करते, परंतु प्रवाशी धडा घेताना दिसत नाही. ही कारवाई रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी राऊत, रेल्वेच्या पोलीस उपनिरीक्षक उषा बिसने, पोलीस कर्मचारी दिक्षीत, जाधव, शर्मा यांनी केली. यावेळी रेल्वे कमेटी सदस्य एम.डी. आलमखान उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी )

Web Title: 27 lakh penalty for 64 passenger passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.