शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
5
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
7
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
8
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
9
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
10
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
11
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
12
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
13
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
14
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
15
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
16
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
17
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
18
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
19
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
20
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
Daily Top 2Weekly Top 5

251 कृषी वीजपंपांचा वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2022 05:00 IST

लाखांदूर येथील वीज वितरण कंपनी अंतर्गत बारव्हा, लाखांदूर, सरांडी बु. व विरली बु. आदी चार मंडळांतर्गत तालुक्यात एकूण ७ हजार ४ कृषी वीज पंपधारक शेतकरी आहेत. तथापि, बारव्हा मंडळात १ हजार ४३, लाखांदूर मंडळात १ हजार १९३, सरांडी बु. मंडळात १ हजार १३४ व विरली बु मंडळात ३ हजार ६३४ कृषी वीजपंंपधारक शेतकरी आहेत. या कृषी वीज पंपधारक शेतकऱ्यांकडे गत काही वर्षांपासून २४.१८ कोटी रुपयांचा वीजबिल थकीत असल्याची माहिती आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : कृषी धोरण २०२० अंतर्गत कृषी वीजपंपाचे थकित वीजबिलाचा भरणा करण्यासाठी शासनाच्या वीज कंपनी अंतर्गत शेतकऱ्यांसाठी विविध योजना सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी या योजनेकडे दुर्लक्ष करीत नियमित वीजबिलाचा भरणा केला नाही. त्यामुळे वीज वितरण कंपनीने तालुक्यातील २५१ कृषी वीजपंपांचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे.लाखांदूर येथील वीज वितरण कंपनी अंतर्गत बारव्हा, लाखांदूर, सरांडी बु. व विरली बु. आदी चार मंडळांतर्गत तालुक्यात एकूण ७ हजार ४ कृषी वीज पंपधारक शेतकरी आहेत. तथापि, बारव्हा मंडळात १ हजार ४३, लाखांदूर मंडळात १ हजार १९३, सरांडी बु. मंडळात १ हजार १३४ व विरली बु मंडळात ३ हजार ६३४ कृषी वीजपंंपधारक शेतकरी आहेत. या कृषी वीज पंपधारक शेतकऱ्यांकडे गत काही वर्षांपासून २४.१८ कोटी रुपयांचा वीजबिल थकीत असल्याची माहिती आहे. सप्टेंबर २०२० पासून एकूण ७.३४ कोटी रुपयांचे नियमित वीजबिल थकीत आहे.गत काही वर्षापासून कृषी वीजपंप अंतर्गत थकीत व नियमित बिलाचा भरणा करण्यासाठी शासनाने कृषी धोरण २०२०अंतर्गत विविध योजना सुरू केल्या आहेत. या योजनेचा पहिला टप्पा येत्या ३१ मार्चपर्यंत असल्याने तालुक्यातील कृषी वीजपंपधारक शेतकऱ्यांनी शासनाच्या कृषी धोरण २०२० अंतर्गत विविध योजनांचा लाभ उचलण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सात कोटींचे वीज बिल थकीत

- लाखांदूर तालुक्यात एकूण ७ हजार ४ कृषी वीजपंपधारक शेतकरी आहे. या शेतकऱ्यांवर गत काही वर्षांपूर्वीपासून व नियमित वीजबिलाअंतर्गत कोटी रुपयाचे वीजबिल थकीत आहे. दरम्यान, तालुक्यातील एकूण २ हजार ४९ शेतकऱ्यांनी कृषी धोरण २०२० अंतर्गत लाभ उचलत जवळपास १.६१ कोटी रुपयांच्या वीजबिलाचा भरणा केला आहे. दरम्यान, कृषी धोरण २०२०चा लाभ न उचलत गत काही वर्षांपासून थकित व नियमित वीज बिलाचा भरणा न केल्याने वीज कंपनीने तालुक्यातील एकूण २५१ कृषी वीजपंपांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. वीजपुरवठा खंडित केलेल्या शेतकऱ्यांकडे एकूण ४७.४० लाख रुपयांचे नियमित वीजबिल थकीत असल्याने या कृषी वीजपंपधारक शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. 

 

टॅग्स :agricultureशेतीelectricityवीज