गुराख्याच्या पाठीवरून धावल्या २५० गाई

By Admin | Updated: November 14, 2015 00:47 IST2015-11-14T00:47:51+5:302015-11-14T00:47:51+5:30

बलिप्रतीपदेच्या दिवशी विविध पद्धतीने गोधनाची पूजा सर्वत्र केली जाते. परंतु, जमिनीवर पालथे झोपून पाठीवरून संपूर्ण गोधन....

250 cows run on the back of the cow | गुराख्याच्या पाठीवरून धावल्या २५० गाई

गुराख्याच्या पाठीवरून धावल्या २५० गाई

गोधनपूजा : जांभोरावासियांनी जोपासली परंपरा
सिराज शेख मोहाडी
बलिप्रतीपदेच्या दिवशी विविध पद्धतीने गोधनाची पूजा सर्वत्र केली जाते. परंतु, जमिनीवर पालथे झोपून पाठीवरून संपूर्ण गोधन चालवून घेण्याची अनोखी परंपरा मोहाडी तालुक्यातील जांभोरा येथील शेतकऱ्यांनी १५० वर्षांपासून अखंडीतपणे सुरू ठेवली आहे.
गुरुवारी दुपारी १२ ते २ वाजतापर्यंत चाललेल्या या चित्तथरारक गोधन पूजेत जांभोरा येथील गुराखी विनायक सुरेश परतेकी (२८) यांच्या पाठीवरून २५० गार्इंचा कळप चालून गेल्यानंतरही तो सुखरूप आहे. त्याला कोणतीही दुखापत, इजा झाली नाही. गोमातेमुळेच आपण सर्व जिवंत आहोत, तिचे ऋण फेडण्यासाठी आम्ही तिच्या चरणाखाली स्वत:ला वाहून घेतो, यात काहीही वावगे नाही. हा अंधश्रेचाही प्रकार नाही. आमच्या पणजोंबापासून ही प्रथा सुरू आहे. ती कायम ठेवणे कर्तव्य आहे, असे तो हसतमुखाने सांगतो.
मोहाडीपासून ३५ कि. मी. अंतरावर तालुक्याच्या शेवटच्या टोकावर वन टेकड्यांच्या कुशीत जांभोरा हे २५०० लोकवस्तीचे गाव आहे. या गावात सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. या गावात १०० टक्के शेतकरी असून त्या सर्वांकडे मिळून २५० ते ३०० गाई आहेत.
शेती करणे हा मुख्य व्यवसाय या गावात आहे. गावातील सर्व गायी चारायला नेण्याचे काम अनेक पिढ्यांपासून परतेकी कुटुंबाकडे आहे.
१५० वषापुर्वी गोधन अंगावरून चालवण्याची प्रथा परतेकी कुटुंबाने सुरू केली. गावातील सर्व गायींना आंघोळ घातली जाते. शिंग रंगवून व नवीन गेटे, दावे, म्होरकी बांधून त्यांना सजविले जाते.
तांदळाची खिर गायींना खाऊ घातल्यानंतर संपूर्ण गोधनाची गावातून वाजतगाजत मिरवणूक काढली जाते. ही मिरवणूक मुख्य चौकात आल्यानंतर गुराखी जमिनीवर पालथा झोपतो आणि संपूर्ण गोधन त्याच्या पाठीवरून जाते. तरीदेखील गुराख्याला कुठलीही इजा होत नाही. गावातील नागरिक याप्रसंगी सर्व भेदभाव विसरून गोधन पूजेला उपस्थित राहतात.

Web Title: 250 cows run on the back of the cow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.