लग्नात २५० वऱ्हाडी, लॉनला ठोकले सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:24 IST2021-06-29T04:24:10+5:302021-06-29T04:24:10+5:30
दरम्यान २६ जून रोजी ठाणा येथील बावनकुळे सभागृहात आयोजित लग्नात १५० पेक्षा अधिक व्यक्ती उपस्थित होते. सभागृह मालकाला महसूल ...

लग्नात २५० वऱ्हाडी, लॉनला ठोकले सील
दरम्यान २६ जून रोजी ठाणा येथील बावनकुळे सभागृहात आयोजित लग्नात १५० पेक्षा अधिक व्यक्ती उपस्थित होते. सभागृह मालकाला महसूल प्रशासनाने दहा हजार रुपयाचा दंड ठोठावला होता. कोरोना संसर्गाची तिसरी लाट रोखण्यासाठी प्रशासन तयारी करीत आहे. शासनाने अनेक निर्बंध घालून दिले आहे. परंतु या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. खास करून लग्न सोहळ्यात मोठी गर्दी दिसून येते.
बॉक्स
शहरातील बाजारातही गर्दी
भंडारा शहरात कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लेवलचे निर्ब्ंध लागू झाले आहे. सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत बाजारपेठ सुरू राहण्यास मुभा देण्यात आली आहे. या निर्बंधाच्या सोमवार पहिल्या दिवशी बाजारात मोठी गर्दी दिसून आली. शहरात ठिकठिकाणी भरणाऱ्या भाजी बाजारासह मुख्य बाजारपेठेतही गर्दी दिसत होती. शासनाने कोणतेही नियम केले तरी त्याचा भंग आम्ही करूच अशी जणू भंडारेकरांनी प्रतीज्ञाच केलयाचे दिसत आहे. दुसऱ्या लाटेच्या भीषण अनुभव पाठीशी असतानाही विना मास्क फिरणाऱ्यांची संख्याही बाजारात मोठी दिसून येत आहे.
कोट
प्रशासनाचा नागरिकांना त्रास देण्याचा कोणताही उद्देश नाही. कोरोनाची संभाव्य लाट थांबविण्यासाठी निर्बंध पाळणे आवश्यक आहे. भंडारा तालुक्यातील सर्व मंगल कार्यालय व लॉन मालकांनी नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे.
-रवींद्र राठोड, उपविभागीय अधिकारी, भंडारा.