सिहोरा पोलीस ठाण्यात पोलिसांची २५ पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 21:42 IST2018-07-27T21:41:45+5:302018-07-27T21:42:36+5:30

सिहोरा पोलीस ठाण्यात पोलिसांची २५ पदे रिक्त आहे. त्यामुळे येथे कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे. तसेच गुन्ह्यांचा तपास करताना दमछाक होत आहे.

25 posts of police in Sihora police station vacant | सिहोरा पोलीस ठाण्यात पोलिसांची २५ पदे रिक्त

सिहोरा पोलीस ठाण्यात पोलिसांची २५ पदे रिक्त

ठळक मुद्देपोलीस ठाण्यात १० पोलीस हजार : कामाचा वाढता व्याप, सीमेवरील पोलीस चौकी अंधातरी
<p>रंजित चिंचखेडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : सिहोरा पोलीस ठाण्यात पोलिसांची २५ पदे रिक्त आहे. त्यामुळे येथे कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे. तसेच गुन्ह्यांचा तपास करताना दमछाक होत आहे.
मध्यप्रदेश आणि दोन नक्षलग्रस्त जिल्ह्याचे सीमेलगत असलेल्या सिहोरा पोलीस स्टेशनमध्ये मंजूर ५६ पदे आहेत. परंतु ही पदे आजपर्यंतच्या कधीच पुर्णत: भरण्यात आली नाही. पोलीस निरीक्षकाचे १ पद असून उर्वरित ५५ पदे पोलिसांची आहेत. यात २५ पदे रिक्त आहेत. रिक्त पदात सहायक फौजदार चार, हवालदार १०, नायक पोलीस पाच, पोलीस शिपाई सहा यांचा समावेश आहे. पोलीस ठाण्यात ३० पोलीस कार्यरत असले तरी अर्धे अधिक पोलीस दैनंदिन कामात व्यस्त राहतात. अनेक पोलीस कर्मचारी साप्ताहिक सुट्टी, वैद्यकिय रजा, न्यायालय तथा वरिष्ठ कार्यालयात सेवा बजावित आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात पोलीस स्टेशनमध्ये फक्त १० पोलीस कर्मचारी प्रशासकीय कारभार करीत आहेत.
यामुळे बिट मधील प्रशासकीय कामकाज प्रभावित होत आहे. एका बिटमध्ये सात ते आठ गावांचा समावेश होत आहे. बिट अमलदारांची दमछाक होत आहे. सहायक फौजदार व हवालदाराची महत्वपूर्ण पदे रिक्त असतांना घटनेचा तपास करतांना कार्यरत कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. अनुभवी व तपास कार्याला गती देणारे कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात आली नाही.
पोलीस स्टेशनमधील रिक्त पदे भरण्याचे संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात सातत्याने अहवाल पाठविण्यात येत आहेत. परंतु गांभिर्याने घेण्यात येत नाही. आगामी सणासुदीच्या काळात बंदोबस्तात वाढ होणार आहे. त्याचाही ताण पोलीसांवर येणार आहे. वाढत्या गुन्हेगारीला पायबंद घालताना पोलिसांची चांगलीच दमछाक होते. एकाद्या गावात घटना घडल्यास तेथे पोहचण्यास उशिर होत असल्याने नागरिकांच्या रोषाला बळी पडावे लागते. पोलिसांची रिक्त पदे तत्काळ भरण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने पुढाकर घ्यावा अशी मागणी परिसराती नगरिक करीत आहेत.
पोलीस चौकीचा प्रश्न प्रलंबित
बपेरा आंतरराज्यीय सीमेवर जागेचा प्रश्न निकाली काढण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यंत्रणेने चौकी परिसरातील पाहणी केली आहे. परंतु पोलीस चौकी बांधकामाचे अद्याप मुहूर्त काढण्यात आला नाही. निधी नसल्याची माहिती सांगण्यात येत असली तरी गेल्या अनेक वर्षापासून पोलीस चौकी मंजुरीचा प्रश्न निकाली काढण्यात आले नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांत नाराजी व्यक्त होते आहे.

पोलीस ठाण्यात रिक्त पदे असल्याने प्रशासकीय कामकाज प्रभावित होत आहे. कार्यरत पोलिसांवर वाढता ताण, तात्काळ रिक्त पदे भरण्यासाठी जिल्हा कार्यालयाने पुढाकार घ्यावा.
-धनेंद्र तुरकर,
सभापती. जिल्हा परिषद भंडारा

Web Title: 25 posts of police in Sihora police station vacant