कोसरा येथे मधमाशांचा हल्ल्यात २५ जण जखमी
By Admin | Updated: October 8, 2014 23:20 IST2014-10-08T23:20:54+5:302014-10-08T23:20:54+5:30
कोसरा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या लोकावर मधमाशानी हल्ला केला. त्यामुळे लोक भयभीत होवून सैरावैरा पळू लागले. मधमाशांनी २० ते २५ लोकांना दंश करून जखमी

कोसरा येथे मधमाशांचा हल्ल्यात २५ जण जखमी
कोंढा (कोसरा) : कोसरा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या लोकावर मधमाशानी हल्ला केला. त्यामुळे लोक भयभीत होवून सैरावैरा पळू लागले. मधमाशांनी २० ते २५ लोकांना दंश करून जखमी केल्याची घटना दि.६ रोजी घडली.
कोसरा ग्रामपंचायतीचे कर्मचारी दादाराव गभने यांचे दि.५ च्या रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी दि.६ रोजी सकाळी गावातील नागरिक व नातेवाईक मोठ्या संख्येने कोसरा स्मशानभूमीत पोहचले. यावेळी शोकसभा घेण्यात आली. घरी जाण्याच्या अगोदर चितेवर धर्मकाडी टाकून नमस्कार करीत असताना सभोवताल जमलेल्या नागरिकांवर मधमाशानी काही कळायच्या आत अचानक हल्ला केला. त्यामुळे नागरिक सैरावैरा पळू लागले.
अनेकांनी आपल्या मोटारसायकल स्मशानभूमीतच ठेवून गावाच्या दिशेने पळ काढला. यात २० ते २५ व्यक्तींना मधमाशांनी दंश करून त्यांना गंभीर जखमी केले. यामध्ये कोसरा व बाहेरगावचे नागरिक देखिल मोठ्या संख्येने होते. कोसरा येथील गणबा कामथे, भागवत लाखे, सुरेश गाखरे, जनार्धन मेश्राम, विलास मेश्राम, राजू चौधरी, सुनिल वाढई यांच्या हातपायाला व नाकातोंडाला मधमाशानी दंंंंंश केल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. (वार्ताहर)