पत्रकार भवनासाठी २५ लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 22:05 IST2018-02-04T22:05:11+5:302018-02-04T22:05:52+5:30

भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वास्तूसाठी २५ लाख रुपयांचा निधी शासनातर्फे देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

25 lakhs fund for journalist's house | पत्रकार भवनासाठी २५ लाखांचा निधी

पत्रकार भवनासाठी २५ लाखांचा निधी

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस : पत्रकार संघाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन

आॅनलाईन लोकमत
भंडारा : भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वास्तूसाठी २५ लाख रुपयांचा निधी शासनातर्फे देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पत्रकार भवन येथे आयोजित आरोग्य शिबिर व पत्रकार संघाच्या संकेतस्थळ उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. परिणय फुके, आ.चरण वाघमारे, आ.रामचंद्र अवसरे, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी, जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू, नगराध्यक्ष सुनिल मेंढे, पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन भैरम, उपाध्यक्ष राकेश चेटुले, सचिव मिलींद हळवे मंचावर उपस्थित होते. पत्रकार संघाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, पत्रकारांना आव्हानांचा सामना करावा लागतो. पत्रकारांना सोईसुविधा पुरविण्यासाठी शासनाने विविध योजना तयार केल्या आहेत. पत्रकार हल्ला विरोधी कायदा, घरकुल योजना, महात्मा फुले जनआरोग्य योजना आदींचा यात समावेश आहे. पत्रकार भवनाच्या इमारत बांधकामासाठी २५ लाखांचा निधी देण्याची घोषणा त्यांनी केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष चेतन भैरम यांनी केले. संचालन बबन मेश्राम यांनी तर आभार डी.एफ. कोेचे यांनी मानले. यावेळी शशीकुमार वर्मा, काशिनाथ ढोमणे, चंद्रकांत श्रीकोंडवार, सुरेश कोटगले, बाबा बाच्छील यांच्यासह जिल्ह्यातील पत्रकार उपस्थित होते.

Web Title: 25 lakhs fund for journalist's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.