सानगडीत कत्तलीत जाणाऱ्या २३८ जनावरांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:33 IST2021-03-06T04:33:44+5:302021-03-06T04:33:44+5:30

बारडकिन्ही येथील गोशाळेच्या आशा महेंद्र दवे यांना मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. सानगडी येथे एका शेतात ११३ लाल ...

238 animals slaughtered in Sangadi released | सानगडीत कत्तलीत जाणाऱ्या २३८ जनावरांची सुटका

सानगडीत कत्तलीत जाणाऱ्या २३८ जनावरांची सुटका

बारडकिन्ही येथील गोशाळेच्या आशा महेंद्र दवे यांना मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. सानगडी येथे एका शेतात ११३ लाल रंगाचे गोऱ्हे, ४३ काळ्या रंगाचे गोऱ्हे, ५१ पांढऱ्या रंगाचे गोऱ्हे, पाच लाल रंगाचे बैल, सहा काळ्या-पांढऱ्या रंगाचे गोऱ्हे, तीन गायी, दहा पांढऱ्या रंगाचे बैल आणि सात काळ्या लाल रंगाचे बैल ठेवून असल्याची माहिती मिळाली. त्यावरून प्राणी मित्रांनी तेथे जाऊन पाहणी केली तेव्हा आखूड दोरखंडाने जनावरे बांधलेली होती. पुरेसा चारा आणि निवाराही नव्हता. ही जनावरे कत्तलीस जाण्याच्या तयारीत होती. आशा दवे यांनी याप्रकरणी साकोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून आरोपी तुळशीदास खंडाईत (३५) रा. सानगडी व इतर १२ इसमांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांच्या विरूद्ध प्राण्यांना निर्दयतेने वागविण्याचा कायदा सहकलम ५ (ब) ९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: 238 animals slaughtered in Sangadi released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.