महाविद्यालयीन शिक्षकांच्या वेतनाचे २३ लाख थकीत
By Admin | Updated: August 9, 2014 23:32 IST2014-08-09T23:32:55+5:302014-08-09T23:32:55+5:30
जिल्ह्यातील १२ मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचे वेतन थकीत आहे. फेब्रुवारी २०१२ व आॅक्टोबर २०१३ ते फेब्रुवारी २०१४ या महिन्यांचे सुमारे २२ लाख ९२ हजार ६१ रुपये थकीत

महाविद्यालयीन शिक्षकांच्या वेतनाचे २३ लाख थकीत
भंडारा : जिल्ह्यातील १२ मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचे वेतन थकीत आहे. फेब्रुवारी २०१२ व आॅक्टोबर २०१३ ते फेब्रुवारी २०१४ या महिन्यांचे सुमारे २२ लाख ९२ हजार ६१ रुपये थकीत असून ते महिनाभरात न मिळाल्यास विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर्स असोसिएशनच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
फेब्रुवारी २०१२ या महिन्याचे वेतन न मिळालेल्या एकूण १२ महाविद्यालय आहेत. त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्यु.कॉलेज, लाखांदुर, शारदा ज्यु.कॉलेज, तुमसर, सुदामा ज्यु.कॉलेज, मोहाडी, ग्रामविकास ज्यु.कॉलेज, हरदोली, सर्वांगीण शिक्षण ज्यु.कॉलेज, पिंडकेपार, नवनीत ज्यु.कॉलेज, खमारी, मार्तंडराव पाटील कापगते ज्यु.कॉलेज, जांभळी/सडक, मॉडर्न ज्यु.कॉलेज, सातोना, महात्मा गांधी ज्यु.कॉलेज, पहेला, महाराष्ट्र ज्यु.कॉलेज, सिहोरा, शशीकांत दैठणकर ज्यु.कॉलेज, बारव्हा, गंगाराम ज्यु.कॉलेज, मासळ या बारा ज्युनिअर कॉलेजमधील शिक्षकांचे एकूण ४ लाख ३८ हजार १९६ रुपयाचे वेतन शासनाने अडवून ठेवलेले आहे.
आॅक्टोबर २०१३ ते फेब्रुवारी २०१४ पर्यंतचे वेतन खालील सात ज्यु.कॉलेज,च्या शिक्षकांचे थांबलेले आहेत. त्यामध्ये सुदामा ज्यु.कॉलेज, मोहाडी, आरएसजीके ज्यु.कॉलेज, तुमसर, ग्रामविकास ज्यु.कॉलेज, हरदोली, मार्तंडराव पाटील कापगते ज्यु. कॉलेज, जांभळी/सडक, सर्वांगीण शिक्षण ज्यु.कॉलेज, पिंडकेपार, दैठणकर ज्यु.कॉलेज, बारव्हा, चैतन्य ज्यु.कॉलेज, बाम्पेवाडा /एकोडी, या सात ज्यु.कॉलेज शिक्षकांचे एकूण १८ ५३ हजार ८६५ रुपयाचे वेतन शासनाकडे थकीत आहेत. एक महिना वेतन मिळाले नाही तर मुलांचे शिक्षण, घरखर्च कसा करावा असा प्रश्न पडतो. संबंधित रकमेची मागणी शिक्षणाधिकारी व अधीक्षक, वेतन पथक, भंडारा यांनी शासनाकडे केली आहे. थकित वेतन न मिळाल्यास विज्युक्टातर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा मार्तंड गायधने व राजेंद्र दोनाडकर यांनी दिला आहे. (शहर प्रतिनिधी)