२२६ पाणवठ्यांवर होणार वन्यप्राण्यांची गणना
By Admin | Updated: May 4, 2015 00:49 IST2015-05-04T00:49:48+5:302015-05-04T00:49:48+5:30
वन्यजीव संवर्धन कार्यात अधिकाधिक लोकांचा सहभाग असावा म्हणून बुध्द पौर्णिमेला मचाणावरील वन्यजीव गणना आयोजित

२२६ पाणवठ्यांवर होणार वन्यप्राण्यांची गणना
३८० प्रगणकांची नोंद : बुद्ध पौर्णिमेसाठी प्रशासन सज्ज
साकोली/पवनी/लाखांदूर/आमगाव/करडी :
वन्यजीव संवर्धन कार्यात अधिकाधिक लोकांचा सहभाग असावा म्हणून बुध्द पौर्णिमेला मचाणावरील वन्यजीव गणना आयोजित करण्यात येणार आहे. होणारी व्याघ्रगणना शास्त्रीय आधारावर केली जाते. २२६ पाणवठ्यांवर वन्यप्राण्यांची गणना करण्यात येणार आहे. ३८० प्रगणकांची नोंद करण्यात आली आहे.
नागझीरा-नवेगांव व्याघ्र राखीव क्षेत्रफळ ६५ हजार ६०० हेक्टरमध्ये आहे. चार अभयारण्यात विभागणी करण्यात आली आहे. त्यामध्ये कोका, नवीन नागझीरा, नागझीरा व नवेगाव अभयारण्याचा समावेश आहे. याशिवाय नवेगाव राष्ट्रीय उदयानसुध्दा समावेश आहे. वनविभाग व वन्यजीव विभागाद्वारे जय्यत तयारी करण्यात येत आहे.
वन्यजीवांच्या संवर्धन कार्यात नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी पाणवठयावरील गणना सुरु करण्यात आली होती.
त्या अंतर्गत पाणवठयाजवळ मचाण उभारुन त्यावरुन वन्यजीवांचे निरीक्षण व अभ्यास करण्याची संधी उपलब्ध करुन दिली जात आहे. त्यांना वन्यप्राण्ंयाची प्रत्यक्ष ओळख व्हावी तसेच कोणत पाणवठ्यावर कोणते प्राणी किती प्रमाणात आढळतात याची माहिती प्राप्त करणे. प्रगणनेवरुन अभयारण्यात प्रशासनाला पुढील व्यवस्थापन करण्यास भरीव मदत होणार आहे.
महाराष्ट्र, मध्यप्रदेश, कर्नाटक उत्तर प्रदेशच्या विविध शहरातील प्रगणकांनी बुध्द पौर्णिमेला ४ मे रोजी पाणवठ्यावर वन्यप्राण्यांची गणना करण्याकरिता नोंद करण्यात आलेली आहे.
नागपूर, गोंदिया, भंडारा मुंबई, साकोली, लाखनी, जळगाव, आलापल्ली, बंगळूर, ठाणा, रायगड, भोपाळ, मुरेना असे गणन करण्याकरिता अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती आहे. (लोकमत न्युज नेटवर्क)
बुध्द पौर्णिमेला पाणवठ्यावर वन्यप्राण्यांची गणना करण्याकरिता नागझीरा अभयारण्य प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. प्रगणकांना याच ठिकाणी बोलावण्यात येणार आहे. याची माहिती त्यांना एसएमएस व फोनवरुन देण्यात येईल. सकाळी सात-आठच्या दरम्यान निर्धारित ठिकाणी पोहचणे गरजेचे आहे.
-ए. एस. खुणे
उपसंचालक नागझीरा-नवेगाव व्याघ्र राखीव क्षेत्र
कोका अभयारण्यात प्राणिगणना
करडी(पालोरा) : कोका वन्यजीव अभयारण्यात ४ मे रोजी बुध्द पौर्णिमेच्या दिवशी सकाळपासून दुसऱ्या दिवसीच्या सकाळपर्यंत प्राणी गणना केली जाणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने तयारी चालविली आहे. कोका वन्यजीव अभयारण्यात वाघ, बिबट, अस्वल, कोल्हे, रानकुत्रे, रानकोंबड्या, सांबर, हरिण, चितळ, भेकरु, निलगाय, ससे यांचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात आहे. मात्र त्यांची नेमकी संख्या किती हे समजण्यासाठी दिनांक ४ मे रोजी प्राणी प्रगणना वनकर्मचारी, वनअधिकारी, वन्यप्राणी प्रेमी, स्वयंसेवी संस्था यांचे माध्यमातून केली जाणार आहे. न्यू नागझीरा अभयारण्यात सुध्दा याच दिवशी प्राणी गणना होणार असून वन्यजीव प्रेमीमध्ये उत्सुकता शिगेला पोहचली आहे. यासंबंधी कोका वन्यजीव अभयारण्याचे वनक्षेत्राधिकारी देवंद्र कुंभारे यांनी कळविले.
लाखांदूर : वनविभागातर्फे बुध्द पोर्णिमेला जंगलात सतत २४ तास मचानावर बसून प्राण्यांची संख्या मोजली जाते. यासाठी वनविभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी प्राणी गणनेच्या तयारीला लागले आहेत. लाखांदूर तालुका जंगल व्याप्त परिसर आहे. दांडेगाव, दहेगाव, मालदा, झरी, पारडा, पिंपळगाव, कन्हाळगाव, पूयार, मडेघाट, इंदिरा या गावालगत जंगल मोठ्या प्रमाणात आहेत. बिबट, निलगाय, रानकुत्रे, हरिण, सांबर, अस्वल, डुक्कर यासारखे प्राणी मोठया प्रमाणात आहेत.
४पवनी : वन्यजीव अभयारण्य दहा चौरस किलोमीटर परिसरात पसरलेले आहे. येथील जंगल घनदाट, विस्तीर्ण असल्यामुळे वाघ, बिबट, बायसन, हरिण, चित्तळ, साबर आदी वन्यप्राण्यांचा संचार या जंगलात असतो. राष्ट्रीय पक्षी मोर व अन्य पक्षांचाही संचार आहे. या अभयारण्यात १५ पानवठे असून या पानवठ्यावर वन्यप्राणी पाणी प्यायला येतात. या १५ पानवठयाजवळ तेवढयाच मचानी तयार करण्यात आल्या आहेत. या पानवठ्यावर पाणी पिण्यासाठी येणाऱ्या वन्यप्राण्यांची गनना केली जाणार आहे. या दिवशी गणना प्रतिनिधी व नोंदणी करण्यात आलेल्या पर्यटकांनाच अभयारण्यात प्रवेश दिली जाणार आहे. या अभयारण्या व्यतिरिक्त असलेल्या प्रादेशिक वनविभागाच्या पवनी वनपरिक्षेत्रातील जंगलातही वन्यप्राणी गणना केली जाणार आहे. येथे ६ पानवठ्यावर ६ मचाण बांधून वन्यप्राणी गणना केली जाणार आहे.