शेतकऱ्यांना २२० कोटींचे कर्ज वाटप
By Admin | Updated: June 28, 2015 00:48 IST2015-06-28T00:48:08+5:302015-06-28T00:48:08+5:30
खरीप हंगामासाठी जिल्हा बँकेने चालु वित्तीय वर्षात २१९ कोटी ७५ लक्ष ७५ हजारांचे पीक कर्ज वाटप केले आहे.

शेतकऱ्यांना २२० कोटींचे कर्ज वाटप
२८६ कोटींचे उद्दिष्ट : जिल्हा बँकेचा उपक्रम
भंडारा : खरीप हंगामासाठी जिल्हा बँकेने चालु वित्तीय वर्षात २१९ कोटी ७५ लक्ष ७५ हजारांचे पीक कर्ज वाटप केले आहे. जिल्हास्तरीत समितीने ठरवून दिलेल्या उदिष्टापैकी बँकेने ७७ टक्के उदिष्ट पूर्ण केले आहे. बँकेला २८६ कोटी रूपयांचे पीक कर्जाचे उदिष्ट देण्यात आले आहे.
भंडारा जिल्ह्यात धान उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. एकीकडे अस्मानी व सुलतानी संकटामुळे बळीराजा पुरता हतबल झालेला आहे. आधीच अल्पभूधारक शेतकऱ्यांसमोर कर्जाचा डोगर वाढत आहे. यावर्षी पावसाने वेळेवर हजेरी लावली असली तरी धानशेती कसण्यासाठी आवश्यक असलेली साधनसाम्रुगी अपुरी ठरत आहे. परिणामी आर्थिक मदतीसाठी बँकांकडे धाव घ्यावी लागत आहे.
दि भंडारा डिस्ट्रीक्ट सेंट्रल को-आॅपरेटिव्ह बँक भंडारा यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात येत असते. एक लाखापर्यंतचे कर्ज बिगरव्याजी आहे. सद्यस्थितीत चालु वित्तीय वर्षात (२०१५-१६) जिल्हा समितीतर्फे एकूण २८६ कोटी रूपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे लक्षांक देण्यात आले होते. यापैकी दि.२५ जून अखेर ५२ हजार ६०२ सभासदांना २१९ कोटी ७५ लक्ष ७५ हजार रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. हे कर्ज ५८ हजार ६५०.६४ हेक्टर आर क्षेत्रातील पिकासाठी देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
रूपांतरित कर्जापोटी १.३३ कोटींचे वाटप
ज्या गावांची पैसेवारी ५० पैशांच्या आत आहे. अशा गावातील शेतकऱ्यांना ५ किस्तीमध्ये कर्ज फेडण्याची मुभा दिली जाते. त्यात मध्यवर्ती बँकेअंतर्गत रूपांतरित कर्ज देणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील १५४ गावांमधील १६७२ लोकांचे ७ कोटी रूपयांचे कर्ज रूपांतरित करण्यात आले. यापैकी ३३३ सभासदांना २५ जून अखेर १ कोटी ३३ लक्ष ९० हजार रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.