जिल्ह्यात २१९ पॉझिटिव्ह, ७० व्यक्ती कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 23:50 IST2021-03-25T05:00:00+5:302021-03-24T23:50:02+5:30
शहरी भागात वाढती रुग्णांची संख्या सध्या चिंतेचा विषय असून, प्रशासनाने बाजारपेठेच्या वेळेवर निर्बंध आणले आहे. विविध उपाययोजना केल्या जात असताना कोरोना रुग्णांची संख्या मात्र वाढतच आहे. बुधवारी जिल्ह्यात १८०३ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात भंडारा तालुक्यात १०८, मोहाडी १३, तुमसर २४, पवनी ४३, लाखनी १३, साकोली १६ आणि लाखांदूर तालुक्यात दोन असे २१९ रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यात २१९ पॉझिटिव्ह, ७० व्यक्ती कोरोनामुक्त
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : गत आठवडाभरापासून दररोज कोरोना रुग्णसंख्या वाढत असून, बुधवारी तब्बल २१९ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर भंडारा तालुक्यातील एका वृद्धाचा कोरोनाने मृत्यू झाला. सर्वाधिक कोरोना रुग्ण भंडारा तालुक्यात १०८ आढळून आले आहेत.
शहरी भागात वाढती रुग्णांची संख्या सध्या चिंतेचा विषय असून, प्रशासनाने बाजारपेठेच्या वेळेवर निर्बंध आणले आहे. विविध उपाययोजना केल्या जात असताना कोरोना रुग्णांची संख्या मात्र वाढतच आहे. बुधवारी जिल्ह्यात १८०३ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात भंडारा तालुक्यात १०८, मोहाडी १३, तुमसर २४, पवनी ४३, लाखनी १३, साकोली १६ आणि लाखांदूर तालुक्यात दोन असे २१९ रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एक लाख ६५ हजार २०८ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली.
त्यापैकी १५ हजार ६२१ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या, त्यापैकी १३ हजार ९९८ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली. बुधवारी भंडारा तालुक्यातील एका वृद्धाच्या मृत्यूने कोरोना बळींची संख्या ३३२ वर पोहोचली आहे. सर्वाधिक कोरोना रुग्ण भंडारा तालुक्यात आढळून आले आहेत. आतापर्यंत ६,६८४ रुग्ण एकट्या भंडारा तालुक्यातील आहेत. मोहाडी ११८०, तुमसर १९९७, पवनी १५८७, लाखनी १६६०, साकोली १८२९ आणि लाखांदूर तालुक्यात ६८४ रुग्ण आढळून आले आहेत.
ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १२९१
भंडारा जिल्ह्यात ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या आता १२९१ झाली आहे. त्यात भंडारा तालुक्यात ५८८, मोहाडी ७५, तुमसर १५५, पवनी २५३, लाखनी ११७, साकोली ८३ आणि लाखांदूर तालुक्यातील २० ॲक्टिव्ह रुग्णांचा समावेश आहे. गत महिन्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या शंभरच्या आत होती. परंतु, आता ही संख्या हजाराच्या वर पोहोचली आहे.