भंडारा तालुक्यात २१ हजार काेराेनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:36 IST2021-05-10T04:36:07+5:302021-05-10T04:36:07+5:30
भंडारा : जिल्ह्यात सर्वाधिक काेराेना संसर्गाचा फटका भंडारा तालुक्याला बसला आहे. आतापर्यंत २३ हजार ६६३ व्यक्तींना काेराेनाची बाधा झाली ...

भंडारा तालुक्यात २१ हजार काेराेनामुक्त
भंडारा : जिल्ह्यात सर्वाधिक काेराेना संसर्गाचा फटका भंडारा तालुक्याला बसला आहे. आतापर्यंत २३ हजार ६६३ व्यक्तींना काेराेनाची बाधा झाली हाेती. त्यापैकी २१ हजार १०७ व्यक्ती काेराेनामुक्त झाले आहे. सध्या २०९६ रुग्ण उपचाराखाली आहेत.
जिल्ह्यात भंडारा शहर आणि तालुका काेराेना हाॅटस्पाॅट ठरला हाेता. आतापर्यंत सर्वाधिक काेराेना रुग्ण भंडारा येथेच आढळून येत हाेते. मात्र, तीन दिवसांपासून रुग्णांची संख्या घटून बरे हाेण्याचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत २१ हजार १०७ व्यक्ती काेराेनामुक्त झाले आहे. तालुक्यात काेराेनाने ४०७ व्यक्तींचा मृत्यू झाला. सध्या २०९६ व्यक्ती उपचारांखाली आहेत.
भंडारा शहर काेराेना हाॅटस्पाॅट ठरल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले हाेते. मात्र, त्यानंतरही नागरिक काेराेना संसर्गाचे पालन करताना दिसत नव्हते. संचारबंदीच्या काळातही अनेकजण रस्त्यांवर भटकंती करतानाचे चित्र आहे. अशा स्थितीत आता काेराेना रुग्णांची संख्या घटत असल्याने भंडारा शहरासाठी दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे.
सर्वांत कमी रुग्ण लाखांदूर तालुक्यात
जिल्ह्यात सर्वांत कमी रुग्णांची नाेंद लाखांदूर तालुक्यात झाली आहे. आतापर्यंत येथे २७१४ रुग्णांची नाेंद झाली. त्यापैकी २४०६ व्यक्तींनी काेराेनावर मात केली आहे. ४३ जणांचा काेराेनाने मृत्यू झाला असून, २६५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. भंडारा पाठाेपाठ तुमसरमध्येही रुग्ण संख्या वाढली हाेती.