धनादेश अनादरप्रकरणी २० लाखांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2022 05:00 IST2022-04-08T05:00:00+5:302022-04-08T05:00:14+5:30
भाेजापूर येथील महात्मा फुले काॅलनी मधील रहिवासी चंदनलाल घरडे यांनी वसंत हुमणे यांना खासगी कामासाठी मार्च २०१५ मध्ये हातउसणे १२ लाख ५० हजार रुपये दिले हाेते. त्याबाबत करारनामाही करवून घेतला हाेता. करारनाम्यानुसार २९ जून २०१५ नंतर वेळाेवेळी रक्कम परत देण्याची विनंती केली. परंतु वसंत हुमणे ही रक्कम देण्यास टाळाटाळ करीत हाेते. शेवटी ३० जानेवारी २०१६ राेजी त्यांनी कॅनेरा बॅंकेच्या वरठी शाखेचा धनादेश फिर्यादीला दिला. परंतु सदर धनादेश बॅंक खात्यात वटविला असता ताे बाउंस झाला.

धनादेश अनादरप्रकरणी २० लाखांचा दंड
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : माेहाडी तालुक्यातील वरठी येथील रहिवासी तसेच भंडारा येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष वसंत हुमणे यांना एका आर्थिक फसवणुकीच्या प्रकारात न्यायालयाने फिर्यादीला २० लाख रुपये दंडाची रक्कम चार महिन्यांच्या आत देण्याचे आदेश दिले आहे. तसेच आराेपीने दंडाची रक्कम देण्यास कसूर केल्यास त्यांना चार महिन्यांची शिक्षेचेही प्रावधान करण्यात आले आहे.
भाेजापूर येथील महात्मा फुले काॅलनी मधील रहिवासी चंदनलाल घरडे यांनी वसंत हुमणे यांना खासगी कामासाठी मार्च २०१५ मध्ये हातउसणे १२ लाख ५० हजार रुपये दिले हाेते. त्याबाबत करारनामाही करवून घेतला हाेता. करारनाम्यानुसार २९ जून २०१५ नंतर वेळाेवेळी रक्कम परत देण्याची विनंती केली. परंतु वसंत हुमणे ही रक्कम देण्यास टाळाटाळ करीत हाेते. शेवटी ३० जानेवारी २०१६ राेजी त्यांनी कॅनेरा बॅंकेच्या वरठी शाखेचा धनादेश फिर्यादीला दिला. परंतु सदर धनादेश बॅंक खात्यात वटविला असता ताे बाउंस झाला.
कायदेशीर नाेटीसही २८ मार्च २०१६ ला आराेपीला देऊनही बाउंस झालेल्या चेकवरील रक्कम फिर्यादी चंदनलाल घरडे यांना आराेपीने दिली नाही. त्यामुळे कलम १३८ नुसार तक्रार दाखल करून न्यायालयाने अखेर या आर्थिक व्यवहाराच्या जवळ जवळ सहावर्षांनंतर न्यायालयाने आराेपी वसंत हुमणे यांना आर्थिक व्यवहारातील फसवणुकीच्या कलम १३८च्या गुन्ह्यासाठी दाेषी ठरवून २० लाख रुपये दंड स्वरुपात फिर्यादीला देण्याचे आदेश दिले. तसेच चार महिन्यांची साध्या कारावासाची शिक्षाही आराेपी वसंत हुमणे यांना १६ मार्च २०२२ राेजी न्यायालयाच्या न्याय दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सुनावण्यात आली आहे.
आपसात त्यांचे घरगुती संबंध असल्यामुळे हा आर्थिक व्यवहार घडला. मात्र या आर्थिक फसवणुकीतून चंदनलाल घरडे यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. फिर्यादी चंदनलाल घरडे यांच्या वतीने ॲड. हरडे यांनी काम बघितले व फिर्यादीला न्याय मिळवून दिला. या निर्णयामुळे आता फसवणुक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.