१९ शाळेच्या शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस
By Admin | Updated: September 21, 2014 23:45 IST2014-09-21T23:45:12+5:302014-09-21T23:45:12+5:30
मोहाडी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाद्वारे जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची तपासणी करण्यात आली. ज्या शिक्षकांचे असमाधानकारक कार्य दिसून आले त्या शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस

१९ शाळेच्या शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस
मोहाडीतील प्रकार : पथकाद्वारे तपासणी
मोहाडी : मोहाडी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाद्वारे जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची तपासणी करण्यात आली. ज्या शिक्षकांचे असमाधानकारक कार्य दिसून आले त्या शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस गटशिक्षणाधिकारी एस. बी. राठोड यांनी बजावली आहे.
पंचायत समिती मोहाडी मार्फत सर्व शाळांची पथकाद्वारे तपासणी करण्याचे नियोजन करण्यता आली. त्या नियोजनांची अंमलबजावणी सुरु आहे. आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात पथकाद्वारे विविध शाळांना भेटी देण्यात आल्या आहेत. त्यात २४ शाळांची तपासणी करण्यात आली. ही तपासणी आरटीई कायदा २००९ अंतर्गत करण्यात आली. ज्या शिक्षकांचे कार्य असमाधानकारक आहे अशा १९ शाळेच्या शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्या शिक्षकांना तात्काळ नोटीसाचे उत्तर मागण्यात आले आहे. शाळा तपासणी पथकाच्या भेटीमुळे शाळेतील शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिक्षण विभाग मोहाडीच्या सर्व शिक्षा अभियानअंतर्गत मोफत गणवेश योजनेअंतर्गत दुस-या टप्प्यात १८ लक्ष ३१,६०० रुपये निधी शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यात वर्ग करण्यात आलेला आहे. तसेच सर्व शिक्षा अभियानांतर्गत शाळा अनुदा व ईमारत देखभाल दुरुस्तीचा अनुदान ९,७४,००० व ११,१०,००० इतके रुपये शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे. केंद्र प्रमुखांची एका पंचायत समितीच्या शिक्षण विभागात पार पडली. त्या बैठकीत आरटीई कायदाच्या संबंधाने स्थानिक प्राधिकरणाला शाळेवर नियंत्रण राखण्यासाठी विशेष अधिकार देण्यात आले आहेत. त्या शासन निर्णयांची माहिती सर्व केंद्रप्रमुखांना देण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)