कत्तलखान्याकडे जाणारी १८ जनावरे पकडली

By Admin | Updated: October 17, 2016 00:32 IST2016-10-17T00:32:26+5:302016-10-17T00:32:26+5:30

आंधळगाव पोलिसांनी रात्रपाळीत नाकाबंदी दरम्यान जांब खैरलांजी फाट्यावर दोन बोलेरो पिक गाड्या पकडून ...

18 animals caught near slaughter house | कत्तलखान्याकडे जाणारी १८ जनावरे पकडली

कत्तलखान्याकडे जाणारी १८ जनावरे पकडली

तीन जनावरांचा मृत्यू : एक लाखांचा मुद्देमाल जप्त, आंधळगाव पोलिसांची कारवाई
आंधळगाव : आंधळगाव पोलिसांनी रात्रपाळीत नाकाबंदी दरम्यान जांब खैरलांजी फाट्यावर दोन बोलेरो पिक गाड्या पकडून त्यात डांबून नेत असलेल्या १८ जनावरांना गाड्यासहीत जप्त केले.
आंधळगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार के.बी. उईके यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई प्रशि. पोलीस उपनिरीक्षक धनंजय इंगळे, पो. नि. रविंद्र म्हैसकर, पो. शिपाई लोकेश शिंगाडे, नंदेश्वर धुर्वे यांनी ही कारवाई केली. तुमसर-रामटेक मार्गावरुन १४ आॅक्टोंबरच्या पहाटे बोलेरो पिक गाडी क्र. एम एच ३५ के ४४५३ व एम एच ३५ के ४१०२ ह्या दोन गाड्या भरधाव वेगाने जात होत्या. आंधळगाव पोलिसांना संशय येताच त्यांना थांबवून चौकशी केली. त्यात १८ जनावरे डांबून कत्तलखाना कामठी येथे नेत असल्याचे सिध्द झाले. सदर गाड्या आंधळगाव पोलीस स्टेशनला आणून त्यांच्यावर पशुवैद्यकिय अधिकारी सरदार, चौधरी, डाभरे यांनी तपासणी केली. त्यात तीन जनावरे मृतावस्थेत आढळली. उरलेल्या जनावरांना औषधोपचार करुन गौशालेत पाठविण्यात आले. ही घटना जनतेच्या लक्षात आल्याने जनतेने मोठी गर्दी करुन जनावरांना पाणी व चाऱ्याची उपलब्धता करुन दिली.
यात सोनु मेहर, राम कांबळे, अजय गायधने, श्याम कांबळे, शेखर वैद्य, रवी पाठक यांनी मदत केली यातील आरोपी नौशाम मो. पठाण, मो. शफी कुरेशी, शेख सलमान शेख बसीर, सर्व रा. कामठी जि. नागपूर यांना अटक करुन कलम २७९, ३४, ४२९ भादंवी कलम ११(१)(घ), १९६० नुसार प्राणी निर्दयतेने वागविणे व कलम ९ महाराष्ट्र प्राणीसंरक्षण अ १९९५ नुसार १३९/१७७-३/१८१, २३९ एमएम सीआर १७७ मोटर व्हेईकल नुसार अटक केली आहे. तपास ठाणेदार के. बी. उईके व त्यांचे सहकारी करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: 18 animals caught near slaughter house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.