सहा वर्षांत १७४ जणांनी केले मरणोत्तर नेत्रदान

By Admin | Updated: June 10, 2016 00:30 IST2016-06-10T00:30:18+5:302016-06-10T00:30:18+5:30

रक्तदानाने एखाद्याचा जीव वाचविता येतो तर नेत्रदानाने दृष्टी गमावलेल्या व्यक्तींना सृष्टीचे दर्शन होऊ शकते.

174 people took posthumous eyes in six years | सहा वर्षांत १७४ जणांनी केले मरणोत्तर नेत्रदान

सहा वर्षांत १७४ जणांनी केले मरणोत्तर नेत्रदान

जागतिक दृष्टिदान दिन आज : ९.५६ लाख विद्यार्थ्यांची तपासणी
देवानंद नंदेश्वर भंडारा
रक्तदानाने एखाद्याचा जीव वाचविता येतो तर नेत्रदानाने दृष्टी गमावलेल्या व्यक्तींना सृष्टीचे दर्शन होऊ शकते. मागील सहा वर्षात १७४ जणांनी मरणोत्तर नेत्रदान करून दृष्टी नसलेल्यांच्या आयुष्यात जगण्याची नवी उमेद पेरली आहे.
डॉ. आर. एल. भालचंद्र यांनी आजवर सर्वाधिक ९० हजार नेत्र शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्यामुळे आरोग्य संस्थामध्ये डॉ. भालचंद्र यांचा स्मृतीदिन दृष्टीदान दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, दोन उपजिल्हा रुग्णालय, सात ग्रामीण रूग्णालय आणि ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रात डोळ्यांची तपासणी व उपचार केले जातात. राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमातंर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयात भिंग प्रत्यारोपण, ४० वर्षांवरील नागरिकांना चष्म्यांचे वितरण, मधुमेहामुळे डोळ्यावर परीणाम झाल्यानंतर त्यावर उपचार करणे, काचबिंदूवर उपचार व शस्त्रक्रीया, गरजू विद्यार्थ्यांना चष्मे वाटपाची सुविधा आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयात चार व तुमसर उपजिल्हा रुग्णालयात एक असे पाच नेत्र चिकित्सक आहेत. या चिकित्सकांना सन २०१५-१६ मध्ये २,१५८ शस्त्रक्रीयेचे उद्दीष्ट देण्यात आले होते. पाचही चिकित्सकांनी उत्कृष्ठ सेवा देत ३,९९२ शस्त्रक्रीया पार पाडली. याची टक्केवारी १८५ इतकी आहे. यात डॉ. एल.के. फेगडकर यांनी सर्वाधिक ३३९ टक्के शस्त्रक्रीया केल्या आहेत. डॉ.विनोद घडसिंग यांनी १२० टक्के, डॉ. के. खोब्रागडे यांनी ११४ टक्के, डॉ. के. धकाते यांनी १७५ टक्के आणि डॉ. चव्हाण यांनी १७६ टक्के शस्त्रक्रीया केल्या आहेत.

Web Title: 174 people took posthumous eyes in six years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.