शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅव्हल्स पेटविल्याप्रकरणी खैरीच्या १७ जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 22:15 IST

दुचाकीस्वाराच्या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या ट्रॅव्हल्सला पेटवून दिल्याप्रकरणी खैरी पट येथील १७ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी केलेल्या मध्यस्थीनंतर मध्यरात्रीच्या सुमारास मृतदेह घटनास्थळावरुन हलविण्यात आला.

ठळक मुद्देलाखांदूरची घटना : मध्यरात्री निवळला तणाव

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : दुचाकीस्वाराच्या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या ट्रॅव्हल्सला पेटवून दिल्याप्रकरणी खैरी पट येथील १७ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी केलेल्या मध्यस्थीनंतर मध्यरात्रीच्या सुमारास मृतदेह घटनास्थळावरुन हलविण्यात आला.लाखांदूरजवळील चुलबंद नदीच्या पुलावर गुरुवारी रात्री ८ वाजता दुचाकीला ट्रॅव्हल्सने धडक दिली. त्यात रमेश बाळकृष्ण पिलारे (२६) रा. खैरीपट हा तरुण जागीच ठार झाला. मळेघाट येथून खैरीपटचे नागरिक लग्नसोहळा आटोपून परत येत होते. त्यांना हा अपघात दिसला. अपघातात गावातील एक तरुण ठार झाल्याचे पाहताच नागरिक संतप्त झाले. त्यांनी नागपूर ते तिबेटकॅम्प (अर्जुनीमोरगाव) जाणाऱ्या बाबाश्री ट्रॅव्हल्सला पेटवून दिले. यामुळे तणाव निर्माण झाला. पोलिसांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला परंतू कुणी ऐकण्याच्या मनस्थीतीत नव्हते. अखेर अड्याळ, दिघोरी, पवनी आणि भंडारा येथून अतिरिक्त पोलीस दल पाचारण करण्यात आले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर तिक्कस, काटे, लाखांदूरचे ठाणेदार निशांत मेश्राम, पवनीचे ठाणेदार यशवंत सोलसे घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान लाखांदूरचे ठाणेदार निशांत मेश्राम यांनी पुढाकार घेत नागरिकांची समजूत काढली. तेव्हा रात्री १२ वाजताच्या सुमारास रमेशचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आला. याप्रकरणी लाखांदूर पोलिसांनी खैरीपट येथे तब्बल १७ जणांवर गुन्हे दाखल केले आहे.ट्रॅव्हल्सचा झाला कोळसानागपूर ते तिबेटकॅम्प जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला संतप्त नागरिकांनी गुरुवारी रात्री पेटवून दिले. काही क्षणातच संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून कोळसा झाली. सुदैवाने या बसमधून प्रवास करणारे सर्व प्रवासी आपल्या सामानासह खाली उतरले.

टॅग्स :Accidentअपघातfireआग