मत्स्यपालनासाठी संस्थांना १६ लाखांची मदत

By Admin | Updated: August 11, 2015 00:46 IST2015-08-11T00:46:24+5:302015-08-11T00:46:24+5:30

भंडारा जिल्ह्यात सन २०१२-१३ ला झालेल्या अतिवृष्टीत शेतकऱ्यांसह मच्छीमार बांधवाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

16 lacs to the institutions for fisheries | मत्स्यपालनासाठी संस्थांना १६ लाखांची मदत

मत्स्यपालनासाठी संस्थांना १६ लाखांची मदत

नुकसानभरपाई सन २०१२-१३ ची : बाळा काशीवार यांच्या प्रयत्नांना यश
साकोली : भंडारा जिल्ह्यात सन २०१२-१३ ला झालेल्या अतिवृष्टीत शेतकऱ्यांसह मच्छीमार बांधवाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यासाठी केंद्र शासनाने त्यावेळी मच्छीमार सोसायट्यांना नुकसानभरपाई म्हणून महाराष्ट्र राज्यासाठी १२ कोटी ८७ लाख मंजूर केले होते. त् यापैकी भंडारा जिल्ह्यातील १२२ मत्स्यपालन सहकारी संस्थांना आ. बाळा काशीवार यांच्या प्रयत्नाने २ कोटी १६ लक्ष रुपये मिळणार आहेत.
आ. काशीवार यांची लोकमतला दिलेल्यााहितीनुसार, महाराष्ट्रात सन २०१२-१३ ला अतिवृष्टी झाली होती. त्यात संपूर्ण तलाव, नदी नाले भरून शेतीचे व मत्स्यशेतीचे अतोनात नुकसान झाले होते.
त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकारनी फक्त शेती नुकसानभरपाई म्हणून हेक्टरी आर्थिक मदत केली होती व मासेमार बांधवांकडे निधीची कमतरता म्हणून दुर्लक्ष केले होतेव केंद्राकडे मदतीसाठी प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर त्याच वर्षी केंद्राने मत्स्यपालन सहकारी संस्थांना आर्थिक मदत म्हणून महाराष्ट्रातील सहकारी संस्थासाठी १२ कोटी ८७ लक्ष रुपये पाठविले होते.
मात्र काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने एक निधीची फाईल दडवून ठेवली होती व ही आर्थिक मदत मच्छीमारांना दिली नव्हती. याची माहिती मिळताच आ. बाळा काशीवार यांनी ती मंत्रालयातील फाईल संबंधित मंत्रालयातून उघडण्यास भाग पाडले व त्याचा पाठपुरावा करीत संबंधित योग्य ती कारवाई करण्यास संबंधित अधिकाऱ्यांना भाग पाडले. तसे आदेश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
ही आर्थिक मत प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्या खात्यात जमा करण्यात आली असून आतापर्यंत ही मदत सर्व सहकारी संस्थांना मिळाली असती मात्र पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीदरम्यान लागलेल्या आचारसंहितेमुळे हा निधी वर्गात संस्थांना प्राप्त झाला नाही. मात्र लवकरच हा निधी संबंधित संस्थांना मिळणार आहे. (तालुका प्रतिनिधी)

अशी मिळणार नुकसान भरपाई
त्यावेळच्या अतिवृष्टीत मासेमारीसाठी लागणारी नाव (लाकडी बोट), जाळ वाहून गेली, फाटली तसेच तलाव, बोड्यांमधील मासे इतरत्र वाहून गेली. त्याप्रमाणे झालेली नुकसान भरपाई म्हणून तलावाची क्षमता पाहून ही मदत देण्यात येणार आहे. जी मोठी तलाव आहेत. त्यांना प्रती हेक्टरी ३००० रुपये तर लहान तलावांना प्रती हेक्टरी ५००० रुपये प्रमाणे मदत मिळणार आहे.

Web Title: 16 lacs to the institutions for fisheries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.