जिल्ह्यात १६ कोरोनामुक्त, तीन पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:23 IST2021-06-27T04:23:29+5:302021-06-27T04:23:29+5:30

६४३ व्यक्तींची कोरोना चाचणी केल्यानंतर केवळ तुमसर दोन आणि लाखांदूर येथे एक असे तीन रुग्ण आढळून आले. भंडारा, मोहाडी, ...

16 corona free, three positive in the district | जिल्ह्यात १६ कोरोनामुक्त, तीन पॉझिटिव्ह

जिल्ह्यात १६ कोरोनामुक्त, तीन पॉझिटिव्ह

६४३ व्यक्तींची कोरोना चाचणी केल्यानंतर केवळ तुमसर दोन आणि लाखांदूर येथे एक असे तीन रुग्ण आढळून आले. भंडारा, मोहाडी, पवनी, लाखनी, साकोली येथे कोरोना रुग्णांची नोंद झाली नाही. १६ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आतापर्यंत जिल्ह्यात ५८ हजार २७२ व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहे.

गत काही दिवसापासून ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या वेगाने कमी होत आहे. जिल्ह्यात सध्या ६६ ॲक्टिव्ह रुग्ण असून त्यात भंडारा १३, मोहाडी नऊ, तुमसर पाच, पवनी एक, लाखनी दहा, साकोली १३, लाखांदूर १५ रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख १३ हजार ८४० व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात ५९ हजार ४६४ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले तर ११२६ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला.

Web Title: 16 corona free, three positive in the district