शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

अवकाळीचा १५७ गावांना फटका; ४३७३ शेतकरी बाधित

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 4:33 PM

सर्वेक्षणाचा प्राथमिक अहवाल : १,५१९.५० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत झालेला वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे १५७ गावांतील १,५१९.५० हेक्टर क्षेत्रातील उन्हाळी धान, भाजीपाला व फळपिकांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसान उन्हाळी धानाचे असून त्या पाठोपाठ आंबा आणि भाजीपाला पिकांचे आहे. महसूल विभागाच्या सर्वेक्षणाचा प्राथमिक अंदाज आला असून त्यात ही नोंद घेण्यात आली आहे.

जिल्ह्यातील तुमसर आणि मोहाडी या दोन तालुक्यांमध्ये हे नुकसान अधिक आहे. प्रशासनाच्या १ मे ते ९ मे या कालावधीत झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीच्या प्राथमिक अहवालातील आकडेवारीनुसार, मोहाडी तालुक्यातील १०७ गावे आणि तुमसर तालुक्यातील ५० गावांमध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या दोन्ही तालुक्यांमध्ये ४.३७३ शेतकरी बाधित झाले आहेत. त्यात मोहाडी तालुक्यातील ३,४१८ आणि तुमसर तालुक्यातील ९५५ शेतकऱ्यांचा समावेश आहे.

धानावरोबरच आंबा व इतर फळपिके व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. अहवालानुसार, सध्या जिल्ह्यातील सर्व ७ तालुक्यांमध्ये सुमारे ७०,२२७ हेन्टर क्षेत्रावर शेतकयांनी उन्हाळी पिकांची लागवड केली, त्यापैकी १,५१९.५० हेक्टर क्षेत्रातील पिके नष्ट झाली आहेत.

पावसाने जनजीवन विस्कळीतमासळ : मासळ व परिसरात गुरुवारी झालेल्या अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सुमारे एक तास झालेल्या वादळी वाऱ्यासह धान पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी आली आहे. सध्या मासळ परिसरात मोठ्या प्रमाणात धान पीक कापणीला आले आहे. बप्याच शेतकयांनी धान पीक कापून शेतातच ठेवला होता. परंतु झालेल्या अवकाळी पावसाने धान पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. उमे धान, वादळी पावसाने खाली पडले असून उत्पादनात असलेले निश्चितपणे घट होणार आहे. ऐन हातात आलेले पीक अवकाळी पावसाने हिरावल्याने शेतकरी वर्गात चितेचे सावट पसरले आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तलाठी, मंडळ अधिकारी यांनी तत्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आहे.

शेती नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेशमोहाडी : तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले. मोहाडी तालुक्यातील १०८ गावांतील पिकांचे पंचनामे तात्काळ करण्याबाबत तहसीलदार सुरेश वाघचौरे यांनी आदेश काढले आहेत. पंचनामे करताना मोहाडी तालुक्यासाठी नियुक्त केलेल्या विमा प्रतिनिधी यांना सोबत घ्यावे. कोणत्याही परिस्थितीत नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे शिल्लक राहणार नाही याची काळजी घेतली जावी. तातडीने कार्यवाही करुन संयुक्त स्वाक्षरीचा अहवाल सादर करण्याबाबत जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी निर्देश दिले आहेत. नुकसानग्रस्त शेतकरी लाभापासून वंचित राहिल्यास काही तक्रार प्राप्त झाल्यास कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

शहापूर परिसरात अवकाळी पाऊसशहापूर : परिसरात सकाळपासून ढगाळ होते. सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास परिसरामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू झाला. अध्र्ध्या तासाच्या अंतराने जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. विशेष करून शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फटका अधिक प्रमाणात बसला. अनेक ठिकाणी मंडप डेकोरेशन व्यावसायिकांना याचा तडाखा बसला, कार्यक्रमाच्या ठिकाणी उभे असलेले मंडप कोसळून पडले. अचानक झालेल्या पावसामुळे महामार्गावरील वाहतू‌कसुद्धा प्रभावित झाली दरम्यान हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज खरा ठरल्याचे चित्र आहे.

टॅग्स :bhandara-acभंडाराAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी