जिल्ह्यात एकूण तपासणीच्या १५.३५ टक्के कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:35 IST2021-05-26T04:35:28+5:302021-05-26T04:35:28+5:30

बॉक्स मंगळवारी एकाचा मृत्यू; ११९ पॉझिटिव्ह जिल्ह्यात मंगळवारी १६२१ व्यक्तींची चाचणी करण्यात आली. त्यात ११९ पॉझिटिव्ह आढळून आले. भंडारा ...

15.35 per cent corona positive of the total test in the district | जिल्ह्यात एकूण तपासणीच्या १५.३५ टक्के कोरोना पॉझिटिव्ह

जिल्ह्यात एकूण तपासणीच्या १५.३५ टक्के कोरोना पॉझिटिव्ह

बॉक्स

मंगळवारी एकाचा मृत्यू; ११९ पॉझिटिव्ह

जिल्ह्यात मंगळवारी १६२१ व्यक्तींची चाचणी करण्यात आली. त्यात ११९ पॉझिटिव्ह आढळून आले. भंडारा तालुक्यात ४३, मोहाडी १३, तुमसर २५, पवनी १८, साकोली १८ आणि लाखांदूर येथील दोन रुग्णांचा समावेश आहे. लाखनी तालुक्यात मंगळवारी एकही रुग्ण आढळून आला नाही, तर १६९ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. पवनी तालुक्यातील एका ६५ वर्षीय पुरुषाचा कोरोनाने मृत्यू झाला.

बॉक्स

५६ हजार १४३ कोरोनामुक्त

जिल्ह्यात आतापर्यंत ५६ हजार १४३ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. त्यात भंडारा तालुक्यात २३ हजार ५७४, मोहाडी ४१४१, तुमसर ६८१८, पवनी ५७६७, लाखनी ६२६३, साकोली ६८४३ आणि लाखांदूर तालुक्यात २७३७ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सध्या जिल्ह्यात ९२८ ॲक्टिव्ह रुग्ण असून, त्यात भंडारा ३७०, मोहाडी ५६, तुमसर ९१, पवनी ८७, लाखनी ९२, साकोली १६२ आणि लाखांदूर तालुक्यात ७० रुग्णांचा समावेश आहे.

Web Title: 15.35 per cent corona positive of the total test in the district