१५०० चौरस कि.मी.चे वन क्षेत्रफळ धोक्यात
By Admin | Updated: August 30, 2014 23:26 IST2014-08-30T23:26:50+5:302014-08-30T23:26:50+5:30
वेतन वाढीच्या मुद्यांवरून वनकर्मचाऱ्यांचे सोमवारपासून आंदोलन सुरू आहे. आज आंदोलनाचा सहावा दिवस असूनही वन मंत्रालयाकडून आंदोलनाची दखल घेण्यात आली नाही. यामुळे जिल्ह्यातील

१५०० चौरस कि.मी.चे वन क्षेत्रफळ धोक्यात
भंडारा : वेतन वाढीच्या मुद्यांवरून वनकर्मचाऱ्यांचे सोमवारपासून आंदोलन सुरू आहे. आज आंदोलनाचा सहावा दिवस असूनही वन मंत्रालयाकडून आंदोलनाची दखल घेण्यात आली नाही. यामुळे जिल्ह्यातील १५१७ चौरस किलोमिटर वनक्षेत्रफळ धोक्यात आले आहे. आंदोलनादरम्यान वृक्षतोड व वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या शिकारी झाल्याचा संशय संपावरील वनकर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
गुरूवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वनकर्मचाऱ्यांच्या संपाबाबत तोडगा निघाला नाही. त्यामुळे हा संप आणखी किती दिवस लांबेल याची शाश्वती नाही.
भंडारा जिल्ह्यातील पाचशेच्यावर वनपाल, वनरक्षक व वनकर्मचारी संपात सहभागी झाले आहे.
जिल्ह्याचे वनक्षेत्रफळ १५१७ चौरस किलोमिटरचे आहे. यात वनरक्षकाकडे ४०० ते ८०० हेक्टर जंगलाची जबाबदारी आहे. तर वनपालाकडे २ हजार ते २ हजार ५०० हेक्टर जंगलाची जबाबदारी आहे. एका वनपालाकडे ४ ते ५ वनरक्षक कार्यरत आहेत.
सहा दिवसापासून वनकर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असल्याने ते जंगलाकडे भटकले नाहीत. त्यामुळे वृक्षतोडीसोबतच वन्यप्राण्यांच्या शिकार झाल्याची माहिती संपावरील वनकर्मचाऱ्यानी दिली.
भंडारा जिल्ह्यात हरीण, चितर, सांबर यासोबतच तृणभक्षी प्राणीही आहेत. कोका अभयारण्य लागून असल्याने तिथे ६ ते ७ वाघांचा संचार आहे. बिबट ३० ते ४० च्या संख्येत आहे.
सहा दिवसांपासून वनकर्मचाऱ्यांच्या संपाची संधी साधून काही व्यक्तींनी जंगलाकडे वक्रदृष्टी केली आहे. त्यांनी वनप्राण्यांना आपली शिकार बनविण्यासाठी जंगलात जाळे पसरविल्याचीही माहिती आहे. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शिकाऱ्यांवर कोणाचेही वचक राहिले नाही. संप असाच सुरू राहिल्यास वन व वन्यप्राण्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (शहर प्रतिनिधी)