वर्षभरात १५० सापांना जीवनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 22:12 IST2018-01-10T22:12:11+5:302018-01-10T22:12:33+5:30
पर्यावरणाचे सर्वघटक शाबुत राहावे, यासाठी पर्यावरणप्रेमी प्रयत्नांची पराकाष्टा करतात.

वर्षभरात १५० सापांना जीवनदान
आॅनलाईन लोकमत
पालांदूर : पर्यावरणाचे सर्वघटक शाबुत राहावे, यासाठी पर्यावरणप्रेमी प्रयत्नांची पराकाष्टा करतात. निसर्गमित्र पर्यावरण संरक्षण व संवर्धन गु्रपचा प्रमुख सुमित हेमणे हा तरूण ध्येयाने प्रेरीत होऊन वर्षभरात १५० सापांना मृत्यूच्या तावडीतून सोडवित जंगलात सोडले.
बालपणापासूनच शेतशिवारात निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालविणारा सुमित प्राणीमात्रावर दया दाखवित त्यांच्याशी जिव्हाळ्यामध्ये नाते जपत आहे. सुमित विज्ञान शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे. विज्ञानाच्या आधारावर समाजातील अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याला सुहास हेमणे, राकेश हेमणे व आदेश गोंदोळे हे सहकार्य करतात. जेवनाळा येथे निसर्गमित्र पर्यावरण संरक्षण व संवर्धन गु्रपची स्थापना करण्यात आली आहे.