२० महिन्यात १५ शाळकरी मुलांचा मृत्यू
By Admin | Updated: December 6, 2014 22:40 IST2014-12-06T22:40:16+5:302014-12-06T22:40:16+5:30
मागील २० महिन्यात विविध दुर्घटनेत १५ शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघडकीला आली आहे. मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून राजीव गांधी विद्यार्थी अपघात अनुदान

२० महिन्यात १५ शाळकरी मुलांचा मृत्यू
११.२५ लाखांचे अर्थसाहाय्य : राजीव गांधी विद्यार्थी अपघात अनुदान योजना
भंडारा : मागील २० महिन्यात विविध दुर्घटनेत १५ शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघडकीला आली आहे. मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून राजीव गांधी विद्यार्थी अपघात अनुदान योजनेतून ११.२५ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात आले आहे.
शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या जीवनाची जोखीम राहावी, यासाठी राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने राजीव गांधी विद्यार्थी सानुग्रह अनुदान योजना सुरू केली आहे. या योजनेत शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांच्या जीवाला काही धोका झाल्यास त्याच्या कुटूंबीयांना विम्याचा लाभ देण्यात येतो. विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावा, हे यामागील मुख्य कारण आहे. अपघातात जीव गमवावा लागणाऱ्या विद्यार्थ्याच्या कुटूंबीयांना प्रत्येकी ७५ हजार रूपयांचे सानुग्रह मदत दिली जाते.
एप्रिल २०१३ ते आॅक्टोंबर २०१४ या २० महिन्यात भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद आाणि खासगी शाळांमधील १५ विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू झाला. या विद्यार्थ्यांच्या कुटूंबीयांना आर्थिक लाभ मिळावा, यासाठी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी अहवाल तयार करुन ते जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे प्रस्ताव सादर केले होते.
त्यानंतर शिक्षण विभागाने राजीव गांधी विद्यार्थी सानुग्रह अनुदान योजनेसाठी जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव पाठविले. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे यांनी अपघातातील मृत विद्यार्थ्यांच्या कुटूंबीयांना प्रत्येकी ७५ हजारांचे अर्थसहाय्य वितरीत करण्यासाठी ११.२५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला.
मृत १५ विद्यार्थ्यांमध्ये मृणाली विनोद बारापात्रे (जनता विद्यालय तुमसर), आयुष चुन्नीलाल खोकले (जि.प. शाळा सालई ता.तुमसर), गणेश देवाजी परतेती (जी. एस. आदर्श विद्यालय येरली, ता.तुमसर), ओमप्रकाश शिवराम मेश्राम (जि.प. शाळा मोगरा, ता.लाखनी), शुभम पुरूषोत्तम वैद्य, आशिष बाळकृष्ण टेंभरे (सिध्दार्थ महाविद्यालय सावरी), ढाकेश यादोराव सार्वे (ग्रामविकास महाविद्यालय कोंढी), अविनाश हरिदास नेवारी (जि.प. शाळा उर्सरा), लखन किशोर रामटेके (माणिकराव सुखदेवे विद्यालय फुलमोगरा), दिपक भोला निनावे (कस्तुरबा विद्यालय बेलगाव), पूजा जयसिंग कोटांगले (प्रशांत विद्यालय माटोरा), अंकित सेवक तिरपुडे (संत तुकाराम विद्यालय कनेरी), सचिन दगडू मडावी (जि.प. शाळा खडकी), शिरीष जगदिश देशमुख (समर्थ विद्यालय लाखनी), वंशिका गजानन केवट (जि.प. शाळा मुंढरी, ता.मोहाडी) यांचा समावेश आहे. (शहर प्रतिनिधी)