सोंडयाटोला उपसासिंचन योजनेच्या थकीत बिलासाठी १५ लाख मंजूर
By Admin | Updated: July 26, 2016 00:46 IST2016-07-26T00:46:37+5:302016-07-26T00:46:37+5:30
सोंडयाटोला उपसासिंचन योजनेद्वारे चांदपूर जलाशय दरवर्षी भरला जातो.

सोंडयाटोला उपसासिंचन योजनेच्या थकीत बिलासाठी १५ लाख मंजूर
प्रश्न मार्गी लागणार : चरण वाघमारे यांच्या प्रयत्नाला यश
भंडारा : सोंडयाटोला उपसासिंचन योजनेद्वारे चांदपूर जलाशय दरवर्षी भरला जातो. यावर्षी ३४ लक्ष रुपये विद्युत बिल थकीत असल्याने विद्युत वितरण कंपनीने विज कापल्याने शेतकरी संकटात सापडलेला असतांनी नापिकिमुळे शेतकरी विद्युत बिलाची थकित रक्कम भरावी, अशी मागणी मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री यांचेकडे आमदार चरण वाघमारे यांनी केली.
वारंवार पाठपुरावा करूनही विद्युत बिल भरण्यासाठी शासनस्तरावर अडचणी येत होत्या. त्याअनुषंगाने मुख्यमंत्र्याशी प्रत्यक्ष भेट घेऊ न मुख्यमंत्री यांनी कार्यकारी संचालक विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर यांना निर्देश दिल्याने भंडारा पाटबंधारे विभागाकडे थकित विद्युत देयकासाठी बंद असलेल्या सोंडयाटोला आणि भंडारा तालुक्यातील टेकेपार उपसासिंचन योजनेचे थकित बिल भरण्यासाठी प्रति योजना १५ लाख रुपये मंजूर करुन बिल भरण्याचे निर्देश दिले. ३४ लाख रुपये थकित बिल असतांनी १५ लक्ष रुपये मंजूर केल्यावर विद्युत वितरण कंपनीला अडचण येवू नये म्हणून उर्जा मंत्र्यांशी चर्चा करुन मार्ग काढण्यात आला असून विद्युत बिल भरताच सोंडयाटोला उपसासिंचन योजना आपण सुरु करु लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना रस्त्यावर येण्याची वेळ येऊ दिली नाही. यावर्षीही आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी राहू असे आ.चरण वाघमारे यांनी सांगिमले. (नगर प्रतिनिधी)