शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

भंडाऱ्यात दुकानदारांनी करवाढीवर दिला १५ दिवसांचा अल्टीमेटम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 15:55 IST

अव्वाचा सव्वा गृहकरवाढीवरून भंडाऱ्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. घरटॅक्स वाढ, अतिक्रमण निर्मूलन या दोन्ही ज्वलंत मुद्यांवर १५ दिवसांच्या आत तोडगा काढावा, अन्यथा यानंतर चर्चा करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करून दाखवू, असा झणझणीत इशारा गुरूवारी पालिकेचे मुख्याधिकारी यांना आंदोलकांनी दिला.

ठळक मुद्देवातावरण तापले काँग्रेस, शिवसेना, फुटपाथ दुकानदारांचा हल्लाबोल

ऑनलाईन लोकमत 

भंडारा : अव्वाचा सव्वा गृहकरवाढीवरून भंडाऱ्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. घरटॅक्स वाढ, अतिक्रमण निर्मूलन या दोन्ही ज्वलंत मुद्यांवर १५ दिवसांच्या आत तोडगा काढावा, अन्यथा यानंतर चर्चा करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करून दाखवू, असा झणझणीत इशारा गुरूवारी पालिकेचे मुख्याधिकारी यांना आंदोलकांनी दिला.काँग्रेस, शिवसेना, फुटपाथ दुकानदार संघटनेने गुरूवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास पालिका कार्यालयावर हल्लाबोल केला. यावेळी हा अल्टीमेटम देण्यात आला. तसेच मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी यांना देण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष जिया पटेल, माजी नगरसेवक धनराज साठवणे यांनी केले. सकाळी ११ वाजतापासून पालिका कार्यालयात कार्यकर्ते व नागरिकांची गर्दी वाढू लागली. पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला. घोषणाबाजी देत आंदोलकाचे शिष्टमंडळ मुख्याधिकारी अनिल अढागळे यांच्या कक्षात चर्चेसाठी गेले. यावेळी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात माजी आ. नरेंद्र भोंडेकर, जिया पटेल, धनराज साठवणे, अ‍ॅड. शिशिर वंजारी, अजय गडकरी, राजकपूर राऊत, सचिन घनमारे, डॉ. नितीन तुरस्कर, शम्मु शेख, मिर्झा अख्तर बेग यासह काँग्रेस, शिवसेना व फुटपाथ संघटनेचे सदस्य, कार्यकर्ते उपस्थित होते. चर्चेदरम्यान फुटपाथ दुकानदारांचे अतिक्रमण निर्मूलन काढण्याची प्रक्रिया तात्काळ थांबविण्यात यावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली.याशिवाय वाढीव गृहकराच्या बाबतीत कार्य केलेल्या कर्मचाऱ्यांना येथे पाचारण करून टॅक्स कसा काय वाढला याचा सर्वांसमक्ष जाब विचारावा, अशी मागणी करण्यात आली. चर्चेदरम्यान वातावरण तापल्याने मुख्याधिकाºयांच्या कक्षात आधीपासूनच पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. चर्चेअंती वाढीव गृहकर टॅक्स व अतिक्रमण निर्मूलनाबाबत येत्या १५ दिवसात समिती गठित करून निर्णय घेण्यात येईल, असे ठोस आश्वासन मुख्याधिकारी अनिल अढागळे यांनी दिले. परिणामी आंदोलकांनी घोषणाबाजी करत पालिकेच्या द्वारावर उभे असलेल्या कार्यकर्ते व नागरिकांना चर्चेदरम्यान झालेल्या आश्वासनाची माहिती दिली. तसेच १५ दिवसात आश्वासनांची पुर्तता न झाल्यास गंभीर परिणामांना पालिका प्रशासनाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.अध्यक्ष-मुख्याधिकारी एकमेकांचेच ऐकतातशहराच्या कुठल्याही समस्येवर नागरिकांची किंवा नगरसेवकांचे म्हणणे ऐकण्यापेक्षा अध्यक्ष व मुख्याधिकारीच एकमेकांशी चर्चा करून एकमेकांचेच ऐकतात, असा मिष्कील युक्तीवाद अ‍ॅड. शिषिर वंजारी यांनी करताच चर्चेदरम्यान हशा पिकला. यानंतर, जनाची ऐकावी असा सुरही व्यक्त झाला.संतप्त होवू नका, चहा प्यामुख्याधिकाऱ्यांच्या दालनात अतिक्रमणाच्या मुद्यावरून फुटपाथ संघटनेचे पदाधिकारी चांगलेच तापले. दुसरीकडे दूषित पाण्याच्या मुद्यावर उपस्थित महिलांनी अध्यक्ष, मुख्याधिकारी यांनी दूषित पाणी एकदा तरी प्यावे मगच जनतेच्या आरोग्याचे महत्व लक्षात येईल, अशी प्रतिक्रिया चर्चेत व्यक्त केली. यावेळी वातावरण धीरगंभीर झाल्याने माजी आ. भोंडेकर यांनी संतप्त होण्यापेक्षा मुख्याधिकाऱ्यांकडून चहा प्या, असे बोलून वातावरण शांत केले.राकाँ-भाजपची भूमिका गुलदस्त्यातगुरूवारी झालेल्या हल्लाबोल आंदोलनात काँगे्रस, शिवसेनेने नागरिकांच्या मुद्यावर पुढाकार घेत आंदोलनात उडी घेतली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आजी-माजी नगरसेवक, कार्यकर्ते दिसले नाही. सत्ता भाजपचीच असल्याने त्यांचे नगरसेवक आंदोलनात नसणे ही बाब मनाला पटणारी असली तरी वाढीव गृहकराच्या बाबतीत पालिकेच्या सभेत भाजप नगरसेवकांनी चांगलाच हल्लाबोल केला होता, हे येथे उल्लेखनीय.

टॅग्स :Governmentसरकार