शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांत ओटीपीच्या फंड्यातून सर्वसामान्यांना दीड कोटीचा गंडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2021 13:18 IST

भंडारा जिल्ह्यातून १५ लाख रुपयांनी अशी ऑनलाइन फसवणूक केली जाते. मागील पाच वर्षांत विविध घटनेत १ कोटी रुपयांनी फसवणूक झाल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देऑनलाइनचा गोरखधंदा : फ्री गेम, अनोळखी ॲप परमिशन देऊ नका

भंडारा : मेहनत न करता पैसे कमाविण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून फसवणूक होत असल्याचे प्रकार बघायला मिळत आहेत. विशेष म्हणजे, ओटीपीच्या माध्यमातून बँकेतून पैसे गायब होत असल्याचे प्रकार घडत आहेत. यात अनोळखी ॲप डाऊनलोड करताना ‘ऑटो रीड ओटीपी’ परमिशनची परवानगी घेतली जात आहे. यातूनच हे प्रकार घडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. वर्षाकाठी भंडारा जिल्ह्यातून १५ लाख रुपयांनी अशी ऑनलाइन फसवणूक केली जाते. मागील पाच वर्षांत १ कोटी रुपयांनी फसवणूक झाली आहे.

आतापर्यंत एखाद्या बँकेतून बोलत असून किंवा एटीएम ग्राहक सेवा केंद्रातून बोलत आहे, असे सांगून ग्राहकांना कॉल येत होता. त्यानंतर तुमचे एटीएम कार्ड बंद होणार, असे सांगून ते सुरू ठेवण्यासाठी ओटीपी विचारून खात्यातून पैसे काढले जायचे. मात्र, आता ही पद्धत बंद झाली आहे. आता डिजिटल युगात सॉफ्टवेअर ॲपच्या माध्यमातून बँकेतून सरळ रक्कम कपात करण्याचे प्रकार घडत आहेत.

गतवर्षी म्हणजे २०२० मध्ये फसवणुकीच्या ५० घटना घडल्या होत्या. त्यापूर्वी २०१९ मध्ये ३५ प्रकरणे, तर गत १० महिन्यांत सायबर माध्यमातून फसवणुकीचे जिल्ह्यात १९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशा प्रकरणात पैसे परत मिळण्याची शक्यता कमीच असते. अनेकदा फसवणूक करणारा इसम अनोळखी नंबरहून व प्रीपेड सीमकार्ड वापरून बोलायचा. दुसऱ्या वेळी तो नंबर लावल्यास तो नंबर ‘आउट ऑफ कव्हरेज एरिया’ किंवा ‘स्विच ऑफ’ असा दाखवितो. आताही तीच बाब घडत आहे. त्यामुळे पैसे एकदा गेले की, ते मिळणे कठीण आहे.

महिन्याकाठी तीन-चार गुन्हे

जिल्ह्यात दरवर्षी सर्वसाधारणपणे २४ लाख रुपयांची फसवणूक होत असल्याचे दिसून येत आहे. महिन्याकाठी तीन-चार गुन्हे घडतच असतात. जास्त रकमेने अनेकांची फसवणूक झाल्याचेही ऐकिवात आहे. परंतु, अनेकदा भीतीपोटी नागरिक समोर येत नाहीत. पोलीस यंत्रणेला तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे, नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीonlineऑनलाइनcyber crimeसायबर क्राइम