१४८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका

By Admin | Updated: June 26, 2015 00:56 IST2015-06-26T00:56:51+5:302015-06-26T00:56:51+5:30

आॅगस्ट ते आॅक्टोबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकांचा कार्यक्रम

148 Gram Panchayats General Elections | १४८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका

१४८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका

भंडारा : आॅगस्ट ते आॅक्टोबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यांतील १४८ ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक तर १४ ग्रामपंचायतींमधील रिक्त पदाच्या पोटनिवडणुकांसाठी २५ जुलैला मतदान होईल. गुरुवारी अधिसूचना प्रसिध्द करण्यात आली असून निवडणुकीची आचारसंहिता जारी झाली आहे.
सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. चार जुलैला मतदान होणार असल्याने राजकीय पक्षांचे नेते जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. राज्य निवडणूक आयोगाने आॅगस्ट ते आॅक्टोबर या कालावधीत ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम करुन राजकीय नेत्यांना कामाला लावून दिले. जिल्ह्यातील १४८ ग्रामपंचायतींच्या ४६१ प्रभागासाठी सार्वत्रिक तर १४ ग्रामपंचायतीसाठी पोटनिवडणूक होत आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करून राजकीय नेत्यांना धक्का दिला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तापलेल्या वातावरणात ग्रामपंचायत निवडणुकीची भर पडणार आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या तरतुदीनुसार अनुसूचित जाती, जमाती किंवा नागरिकांच्या मागासवर्ग यांच्याकरिता राखीव असलेल्या जागेसाठी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराला नामनिर्देशनपत्रासोबत जातीचे प्रमाणपत्र व जात पडताळणी समितीने दिलेले जात पडताळणी प्रमाणपत्राची प्रमाणित प्रत जोडणे बंधनकारक आहे. तसेच निवडणुकीचा २७ जुलैला निकाल जाहीर झाल्यापासून ३० दिवसाच्या आत उमेदवाराला निवडणूक खर्चाचा तपशील द्यावा लागणार आहे. भंडारा जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, अर्बन बँकेची निवडणूक असल्याने जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: 148 Gram Panchayats General Elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.