वर्षभरात १४८ जणांचा अपघाती मृत्यू

By Admin | Updated: January 28, 2015 23:08 IST2015-01-28T23:08:41+5:302015-01-28T23:08:41+5:30

राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या भंडारा जिल्ह्यात चौपदरीकरणाचे जाळे तयार झाल्यानंतर अपघाताचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले आहे. २०१३ च्या तुलनेत २०१४ मधील अपघाताच्या संख्येत ५७ ने घट झाली आहे.

148 deaths due to accident in the year | वर्षभरात १४८ जणांचा अपघाती मृत्यू

वर्षभरात १४८ जणांचा अपघाती मृत्यू

प्रमोद नागदेवे - भंडारा
राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या भंडारा जिल्ह्यात चौपदरीकरणाचे जाळे तयार झाल्यानंतर अपघाताचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले आहे. २०१३ च्या तुलनेत २०१४ मधील अपघाताच्या संख्येत ५७ ने घट झाली आहे.
२०१३ मध्ये ४९८ अपघातात १९० जणांचा मृत्यू तर ६४० जण जखमी झाले. २०१४ मध्ये ४४१ अपघातात १४८ जणांचा मृत्यू तर ६८७ जण जखमी झाले. वाहतूक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील १४ वर्षात जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत ७,५०० अपघात झाले. यात २,३२८ जणांचा मृत्यू झाला असून १०,२३० जण जखमी झाले. हे अपघात राष्ट्रीय महामार्ग आणि त्याअंतर्गत येणाऱ्या १३ राज्य मार्गावर घडले आहेत. मागील १४ वर्षात अपघाताच्या सर्वाधिक घटना २००५ मध्ये नोंदविण्यात आले होते. ७९७ अपघातात १४० जणांचा मृत्यू झाला तर ७२८ जण जखमी झाले होते. सर्वात कमी घटना २००२ मध्ये घडल्या. त्यावेळी ३४६ अपघातात १५५ जणांचा मृत्यू झाला तर ४२६ जण जखमी झाले होते.२००१ मध्ये ५१६ अपघातात १८६ जणांचा मृत्यू झाला तर ७१० जण जखमी झाले होते.२००३ मध्ये ५३६ अपघातात १९० जणांचा मृत्यू तर ८१३ जण जखमी झाले होते. २००३ मध्ये ४५३ अपघातात १६८ जणांचा मृत्यू तर ७५१ जण जखमी झाले होते. २००६ मध्ये ५१० अपघातात १६७ जणांचा मृत्यू तर ८३१ जण जखमी झाले होते. २००७ मध्ये ५८४ अपघातात १६५ जणांचा मृत्यू तर ८११ जण जखमी झाले होते. २००८ मध्ये ५५१ अपघातात १६६ जणांचा मृत्यू तर ८७९ जण जखमी झाले होते. २००९ मध्ये ५२० अपघातात १५८ जणांचा मृत्यू तर ९०१ जण जखमी झाले होते. सन २०१० मध्ये ५४३ अपघातात १७१ जणांचा मृत्यू तर ७२५ जण जखमी झाले. सन २०११ ५१९ अपघातात १५७ जणांचा मृत्यू तर ७१० जण जखमी झाले होते. सन २०१२ मध्ये ४९१ अपघातात १६७ जणांचा मृत्यू झाला तर ६१८ जण जखमी झाले होते. २०१४ मध्ये ही संख्या घटली.

Web Title: 148 deaths due to accident in the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.