ते १४.७४ लाख रायपूर येथील व्यापाऱ्याचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:26 IST2021-05-28T04:26:31+5:302021-05-28T04:26:31+5:30

गोंदिया रेल्वे पोलीस रेल्वेस्थानकावर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी फलाटावर नियमित तपासणी करीत असताना त्यांना संजू बेहरा संशयास्पद स्थितीत साहित्य घेऊन ...

14.74 lakh from a trader in Raipur | ते १४.७४ लाख रायपूर येथील व्यापाऱ्याचे

ते १४.७४ लाख रायपूर येथील व्यापाऱ्याचे

गोंदिया रेल्वे पोलीस रेल्वेस्थानकावर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी फलाटावर नियमित तपासणी करीत असताना त्यांना संजू बेहरा संशयास्पद स्थितीत साहित्य घेऊन आढळला. फलाट क्रमांक-१ वर उभ्या असलेल्या जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये तो चढण्याचा प्रयत्न करीत असताना पोलीस उपनिरीक्षक प्रवीण भिमटे यांनी त्याला पकडले.

संजू बेहरा याला ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली असता त्याच्या जवळ २०००, ५०० व १०० रुपयांच्या भरपूर नोटा आढळल्या. त्या नोटांची मोजणी केली असता १४ लाख ७४ हजार ३०० रुपये असल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणाचा तपास गोंदिया व नागपूरचे आयकर विभाग करीत असून, जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत जप्त करण्यात आलेली ती रक्कम गोंदिया रेल्वे पोलिसांनी सील करून आपल्या ताब्यातच ठेवावी, असे पत्र गोंदिया रेल्वे पोलिसांना दिले आहे. मालकाने आपला नोकर संजू बेहरा याला पैसे आणण्यासाठी पाठविले होते.

Web Title: 14.74 lakh from a trader in Raipur