१३० कामगारांचे साखळी उपोषण
By Admin | Updated: March 19, 2015 00:39 IST2015-03-19T00:35:25+5:302015-03-19T00:39:09+5:30
एलोरा पेपर मिल येथे ३५ वर्षापासून केवळ सहा हजार मासीक वेतनावर काम करणाऱ्या १३० कामगारांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता कारखान्यासमोर १५ मार्चपासून साखळी उपोषण सुरु केले आहे.

१३० कामगारांचे साखळी उपोषण
तुमसर : एलोरा पेपर मिल येथे ३५ वर्षापासून केवळ सहा हजार मासीक वेतनावर काम करणाऱ्या १३० कामगारांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता कारखान्यासमोर १५ मार्चपासून साखळी उपोषण सुरु केले आहे.
भारतीय मजदूर संघ कामगार संघटनेच्या नेतृत्वात एलोरा पेपर मिल देव्हाडा ता.मोहाडी कागद निर्मिती कारखान्याच्या १३० स्थायी कामगारांनी वेतन भविष्य निर्वाह निधी सन २०१३-१४ चे अतिरिक्त कामाचे पैसे, ले आॅफचा थकीत, सुरक्षेची साधने तथा अन्य मागण्यांसंदर्भात शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता कारखान्यासमोर साखळी उपोषण १५ मार्च पासून सुरु केले आहे. सन १९८० च्या दशकात मोहाडी तालुक्यातील देव्हाडा येथे एलोरा पेपर मिल हा कारखाना सुरु करण्यात आला होता. सुरुवातीला या कारखान्यात ५०० कामगार होते. सध्या केवळ स्थायी १३० अस्थायी ४० कामगार कार्यरत आहणे. कामगार जरी कमी असले तरी उत्पादन मात्र तेवढेच घेण्यात येत आहे.
सहाय्यक श्रम आयुक्तांनी १०, १३ व १६ मार्च रोजी भंडारा येथे बैठक बोलाविली होती. या बैठकीत संघटनेचे पदाधिकारी व कारखान्याकडून संचालक उपस्थित झाले होते. बैठकीत संचालक म्हणून या कारखान्यातील सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले होते. येथील मालकांनी कामगारांना केवळ उत्पादन प्रोत्साहन राशी देण्यात येईल असे सांगितले. कारखाना नुकसानीत असल्याने कामगारांच्या अन्य मागण्या मंजूर करता येत नाही असे उत्तर येथील मालक कामगार संघटना व सहायक श्रम आयुक्तांना दिले.
कंपनी व्यवस्थापन मागील ३९ वर्षापासून नियमित कार्यरत कामगाराला येथे केवळ सध्या सहा हजार वेतन देत आहे. या प्रकरणाची चौकशी आतापर्यंत कामगार कल्याण अधिकाऱ्यांनी केली नाही.
येथे नियमित तपासणी आतापर्यंत झाली नाही असा आरोप संघटनेचे अध्यक्ष हरिहर मलीक, मंगलदिप शर्मा, कार्यकारी अध्यक्ष सुरेश काळे, महासचिव मोरेश्वर हलमारे, देविदास भुतांगे, देवेनलाल पटले, अशोक मते यांनी लावला आहे. (तालुका प्रतिनिधी)