ट्रक अपघातात १३ प्रवासी जखमी
By Admin | Updated: May 4, 2016 01:24 IST2016-05-04T01:24:02+5:302016-05-04T01:24:02+5:30
देवरीहून नागपूरकडे जाणाऱ्या कार व ट्रक अपघातात १३ जण जखमी झाले. ही घटना साकोली पोलीस ठाण्यासमोर

ट्रक अपघातात १३ प्रवासी जखमी
साकोली : देवरीहून नागपूरकडे जाणाऱ्या कार व ट्रक अपघातात १३ जण जखमी झाले. ही घटना साकोली पोलीस ठाण्यासमोर मंगळवारला सकाळी ११ वाजेदरम्यान घडली. सर्व जखमीवर उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
एम ४० ए १७०७ ही जीप देवरीहून प्रवासी घेऊन नागपूरकडे जात होती. नांदेडहून देवरीकडे जाणाऱ्या ट्रक सीजी ०८ एल २२४१ यांच्यात धडक झाली यात कारमधील सर्वजण जखमी झाले.
जखमीमध्ये चालक विनोद मेश्राम (३२) रा. नागपूर, छत्रपती वंजारी (६०), हेमकृष्ण लांडगे (३४), ओमकार बारसे (३६), नानाजी चिमनकर (४५), संगीता लांजेवार (४०), नूतन लांजेवार (१०), गोपाल वाघमारे (५२) सर्व राहणार देवरी, क्रिष्णा यादव (३०) रा. बालाघाट, युवराज मेंढे (१८) रा. भजेपार गोंदिया, नंदकिशोर शिवणकर (२२) रा. चिचखेडा, अजीत डोये (१७) रा. भजेपार यांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळावर पोहचले व त्यांनी जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
यावेळी काँग्रेसचे दिलीप मासूरकर यांनी सहकार्य केले. डॉ. रूपेश बडवाईक व त्यांच्या सहकार्यानी जखमीवर उपचार केले. (तालुका प्रतिनिधी)