१३ ग्रामपंचायती महाविकास आघाडीला, चार जागी भाजपा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:36 IST2021-02-16T04:36:01+5:302021-02-16T04:36:01+5:30
मोहाडी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुका चुरशीच्या झाल्या. आरक्षणाचा पेटारा निवडणुकीनंतर खोलण्यात आला. त्यामुळे जांभोरा, खडकी, पाचगाव येथे भाजपासमर्थित उमेदवार ...

१३ ग्रामपंचायती महाविकास आघाडीला, चार जागी भाजपा
मोहाडी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुका चुरशीच्या झाल्या. आरक्षणाचा पेटारा निवडणुकीनंतर खोलण्यात आला. त्यामुळे जांभोरा, खडकी, पाचगाव येथे भाजपासमर्थित उमेदवार अधिक निवडून येऊनही त्या जागा आरक्षाणाने महाविकास आघाडीच्या वाट्याला गेल्या.
यात मांडेसर -किरण शहारे, पाचगाव - संतुलाल गजभिये, पांजरा बोरी - किरण शहारे,
पिंपळगाव /का - रेखा गभणे, कान्हळगाव/सी - जागेश्वर मेश्राम, पिंपळगाव /झं - सविता झंझाडे, केसलवाडा - पूजा काळसर्पे, खडकी - अश्विन बागडे, जांभोरा - वनिता राऊत,
पारडी -शारदा गाढवे, दहेगाव -मनोहर राखडे, भिकारखेडा -ग्यानीराम इलमे, सालई खु -अनिता पटले या ग्रामपंचायतींचा समावेश असल्याचा दावा महाविकास आघाडीने केला आहे. तर पाहुणी - हरिभाऊ धुर्वे, देव्हाडा बु. भारती कांबळे, ताडगाव कांचन हारगुडे हे चार सरपंच भाजपाच्या पारड्यात गेल्या आहेत. असे असले तरी निवडणुकीदरम्यान ग्रामपंचायत सदस्यांची बरीच खेचाखेची झाली. सतरा ग्रामपंचायतींमध्ये महाविकास आघाडी समर्थित १३ सदस्य निवडून आल्याने राजकीय गणिते पुढच्या निवडणुकीत बदलण्याची शक्यता अधिक आहे.